सांगलीसाठी विमानतळ व्हावे या मागणीचे निवेदन देत असताना भाजप अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन कोल्हापूरच्या भूमीवर पाहण्यास मिळाले. विमानतळाच्या एकाच मागणीसाठी केंद्री विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन देत असताना आमदार सुधीर गाडगीळ व खासदार संजयकाका पाटील या दोघांच्या गटाने वेगवेगळी व स्वतंत्र निवेदने दिली. भरीत भर म्हणून याचे छायाचित्रही प्रसिध्दी माध्यमांना पोहचवून प्रसिध्दीसाठी आटापिटाही केला. मात्र, खासदार आणि आमदार गटामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी असलेले भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि जनसुराज्य शक्ती युवाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना सोबत घेउनच हे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा- रायगडमध्ये भाजपची लोकसभेची तयारी, शेकापला आणखी गळती

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
airport funnel zone
आमचा प्रश्न – वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: विमानतळालगतच्या ‘फनेल झोन’चा प्रश्न धसास कधी?
AAI JE 2024 registration begins for 490 Junior Executive
AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

केंद्रीय मंत्री शिंदे हे कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. सांगलीचा विकास व्हायचा असेल तर जलद दळणवळणासाठी सांगलीला विमानतळ हवेच असा आग्रह आहे. यात वावगे ते काहीच नाही. विमानतळासाठी आरक्षित असलेला १६० एकरचा कवलापूरचा भूखंड सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. विमानतळाच्या धावपट्टीसाठी काही जागा कमी पडत असल्याने विमानतळाचा प्रस्ताव गेली चार दशकाहून अधिक काळ रेंगाळला असून कोल्हापूर येथील विमानतळ सुरू झाले असून जत तालुययातील सीमेपासून अवघ्या वीस किलोमीटरवर कर्नाटकातील विजापूरसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर करण्यात आले आहे.

हेही वाचा- नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?

मात्र, गतवर्षी औद्योगिक विकास महामंडळाने एका खासगी कंपनीला १६० एकरचा भूखंड विकण्याचा घाट घातला. तसा करारही झाला होता. मात्र, सांगली स्पाईस इंडस्ट्रिजने या प्रस्तावाला विरोध दर्शवत स्थानिकांना भूखंड द्यावा अशी मागणी केली होती. तथापि, या मागणीला अपेक्षित शासकीय पातळीवरून अनुकूलता मिळाली नाही. परिणामी भूखंडाचा बाजार अंतिम टप्प्यात असतानाच राजकीय, सामाजिक पातळीवरून विरोध होउ लागल्याने हा प्रस्ताव स्थगित झाला असला तरी याचे कवित्व अद्याप सुरूच आहे.

हेही वाचा- धर्मांतर केलेल्या दलित ख्रिश्चन, दलित मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ द्यावा का? संघ परिवार करणार चिंतन

या जागेचा ताबा विमानतळ प्राधिकरणाने घेउन विमानतळ विकसित करावे अशी मागणी आहे. या मागणीला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. मात्र, याबाबतचे निवेदन केंद्रिय मंत्री शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असताना देण्याचे भाजप नेत्यांनी निश्‍चित केले. यानुसार दिीचे लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांच्या स्वाक्षरीने हे निवेदन द्यायला हवे होते. मात्र, आ. गाडगीळ यांनी स्वतंत्रपणे केंद्रिय मंत्री शिंदे यांची भेट घेउन निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नगरसेवक शेखर इनामदार होते. तर याच दरम्यान, खासदारांचे पत्र घेउन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नगरसेवक युवराज बावडेकर, अरविंद तांबवेकर, राहूल सकळे यांच्या समूहाने केंद्रिय मंत्री शिंदे यांची भेट घेउन विमानतळासंबंधी प्रयत्न करण्याची मागणी केली. दोन्ही गटांनी स्वतंत्र भेट घेत मागणी केली असली तरी दोन्ही वेळा देशपांडे आणि कदम यांची उपस्थिती होतीच. आता खासदार-आमदार गटामध्ये कलह नसल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठे तरी पाणी मुरतेय हे यावरून दिसून आले. याचे पडसाद महापालिका निवडणुकीत पाहण्यास मिळतात, की खासदारकीच्या निवडणुकीत हे येणारा काळच सांगेल.