‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे देशात वादंग माजले आहे. भाजपा तसेच उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तर विरोधकांनी हा एक प्रचारकी चित्रपट असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्येही चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे. याच कारणमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाकडून तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी

केरळमध्ये महिलांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडण्यात आले. तसेच ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश करण्यासाठी या महिलांना अन्य देशांत पाठवण्यात आले, असा खोटा प्रचार या चित्रपटात करण्यात आहा आहे, असा दावा भाजपाविरोधी पक्षांकडून केला जात आहे. याच कारणामुळे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच तामिळनाडूमधील मल्टिप्लेक्स ओनर्स असोशिएशनने हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहांच्या मालकांच्या या निर्णयामागे तामिळनाडूमधील डीएमके सरकारचा हात आहे, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

हेही वाचा >> भाजपाच्या घोडेबाजारापासून काँग्रेसचे सरकार वाचविण्यासाठी वसुंधरा राजेंनी गेहलोत यांची मदत केली; राजस्थानमध्ये खळबळ

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ममता बॅनर्जी यांनी या दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांनी मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाला जबाबदार धरले. “मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्ष भाजपासोबत काम करतो. या चित्रपटावर टीका करण्याचे काम माझे नव्हे तर सीपीआय (एम) चे होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजनय यांचा पक्ष भाजपासोबत काम करत आहे. त्यांनी अगोदर काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरची बदनामी केली. आता ते केरळाची बदनामी करू पाहात आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

भाजपाकडून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका

पश्चिम बंगालमध्ये दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्यानंतर भाजपाकडून ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. “ममता बॅनर्जी यांनी हा चित्रपट बंद करून पश्चिम बंगालमधील महिला आणि मुलीवर अन्याय केला आहे. अशा कृत्यांमुळे दहशतवाद्यांना पाठबळ मिळते. संपूर्ण देशाने दहशतवादाला संपवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. केरळमधील पीडित मुलींच्या बाजूने राहण्यापेक्षा दहशतवाद्यांप्रती दयेची भावना का दाखवली जात आहे. हे मला समजण्याच्या पलिकडे आहे,” अशी टीका केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी केली.

हेही वाचा >> शिरुरमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये ‘जर-तर’ची लढाई

भाजपाची ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका

पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनीदेखील ममता बॅनर्जींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगाल सरकार या चित्रपटावर बंदी घालणार, हे अपेक्षितच होत. ममता बॅनर्जी यांना सत्य पाहायचे नाही. त्यांना डोळे बंद करायचे आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील महिला तसेच इतर लोकांना सत्यापासून दूर ठेवायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहादची बरीच प्रकरणं आहेत. चित्रपटावर बंदी घालून पश्चिम बंगालमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा नाही, हेच ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले आहे, अशी खरमरीत टीका मुजूमदार यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनीदेखील ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांनी दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे. मग दी बंगाल फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या काय करतील. त्या आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?” असा सवाल दिलीप घोष यांनी केला.

हेही वाचा >> Karnataka : सोनिया गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

एमके स्टॅलिन यांच्यावरही भाजपाची टीका

तामिळनाडूमध्येही चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे ठरवले आहे. चित्रपटगृहांच्या मालकांनी हा निर्णय घेतल्यानंतर तामिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष नारायण तिरूपती यांनी एम के स्टॅलिन सरकारवर टीका केली. काही शक्तींकडून मुद्दामहून दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली जात आहे, असे तिरुपती म्हणाले. त्यांचा रोख तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडे होता.

तामिळनाडूमध्येही चित्रपटाचे शो रद्द

तामिळनाडूतील अनेक चित्रपटगृहे आणि मल्टिप्केल्समध्ये दी केरला स्टोरी हा चित्रपट दाखवला जात नसला तरी सुरुवातीला ‘पीव्हीआर’सारख्या काही मल्टिप्केल्समध्ये त्याचे काही शो सुरू होते. मात्र या चित्रपटामुळे चित्रपटगृहांसमोर तसेच चित्रपटगृहांमध्येही आंदोलन केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हे शो रद्द करण्यात आले. “या चित्रपटात कोणताही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री नव्हती. त्यामुळे या चित्रपटाला तेवढा प्रतिसादही मिळत नव्हता,” असे एका चित्रपटगृहाच्या मालकाने सांगितले.

हेही वाचा >> Karnataka : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदींचे भावनिक आवाहन; प्रियंका गांधी म्हणाल्या, “पंतप्रधानांना विकासचा विसर”

…म्हणून चित्रपट न दाखवण्याचा घेतला निर्णय

चेन्नईमधील काही मल्टिप्लेक्सने दी केरला स्टोरी या चित्रपटाचे शो दाखवण्याबाबत पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा चित्रपट दाखवू नका, असे थेट सांगितले नाही. मात्र चित्रपटाच्या शोमुळे संभाव्य गोंधळाची स्थितीही त्यांनी नाकारली नाही. त्यामुळे अनेक मल्टिप्लेक्सच्या मालकांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.

तामिळनाडू सरकारने संरक्षण पुरवायला हवे

तामिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष नारायण तिरूपती यांनी एमके स्टॅलिन सरकारवर टीका केली. “मूलतत्ववाद्यांना पाठिंबा देण्याऐवजी दी केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तामिळनाडू सरकारने संरक्षण पुरवायला हवे. सध्या येथे परिस्थिती भीषण आहे. मला वाटते की सरकारची ही नियोजनबद्ध योजना आहे. दी केरला स्टोरी या चित्रपटात दहशतवादी कसे काम करतात, हे सांगण्यात आलेले आहे. चिपटावर बंदी घालण्यासाठी कोणतेही ठोस कारण सांगण्यात आलेले नाही,” अशी टीका तिरूपती यांनी केली.

हेही वाचा >>Karnataka : मतदानाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींचे कन्नडिगांना आवाहन; म्हणाले, “उद्या कर्नाटकची जनता..”

काय पाहावे, काय पाहू नये लोकांना ठरवू द्यावे

भाजपाच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “काय पाहावे आणि काय पाहू नये हे लोकांना ठरवू द्यावे. दुसऱ्यांनी काय पाहावे हे आपण ठरवू शकत नाही. तामिळनाडू सरकार चित्रपटाचे शो कॅन्सल का केले? याबाबत समाधानकारक उत्तर देत नाहीये. याच कारणामुळे हा चित्रपट पाहायलाच हवा, असा संदेश गेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे खुशबू सुंदर म्हणाल्या.

दरम्यान, हा चित्रपट सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात अनेक महिलांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अगोदर ट्रेलरमध्ये अशा महिलांचा आकडा ३२ हजार दाखवण्यात आला होता. नंतर वाद निर्माण झाल्यानंतर हा आकडा तीनपर्यंत खाली आणण्यात आला. तसेच किती महिलांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला, याचा उल्लेख ट्रेलरमधून काढण्यात आला होता.