राज्यातील भाजपाच्या वाढत्या प्रभावास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राष्ट्रवादीविरुद्धचा राग पुन्हा एकदा प्रगट केला आहे. राज्यातील काँग्रेसचे खच्चीकरण आणि भाजपाच्या विस्तारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जबाबादार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी करत राष्ट्रवादी आणि विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतच्या जुन्या संघर्षाला पुन्हा नवी धार दिली आहे. 

हेही वाचा- उस्मानाबादमध्ये पीकविम्याच्या प्रश्नावरून कैलास पाटील -राणा जगजीत सिंग आमने-सामने; दाेन नेत्यांमधील श्रेयवादाच्या लढाईला हिंसक वळण

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
Mahendra Thorve
सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांनी हा हल्ला चढवल्याने येत्या काही दिवसांत यावरून दोन्ही काँग्रेसमध्येच आरोप-प्रत्यारोप घडण्याची शक्यता आहे. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेतील आघाडी सरकारचा  पाठिंबा अचानक काढून घेतल्याने राज्यात भाजपाची ताकद वाढण्यास आणि पुढे सत्ता येण्यास मदत झाल्याचा आरोप चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, की सन २०१४ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकारचे काम चांगले सुरू होते. परंतु माझा हा कारभार काहींना आवडत नव्हता. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. पुढे या पक्षाने राज्यात मोठा विस्तार केला, सत्ता प्रस्थापित केली. या साऱ्याला कोण कारणीभूत आहे हे आता सगळ्यांना समजले असल्याचे मत व्यक्त करत चव्हाण यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा लक्ष्य केले. चव्हाण यांनी अनपेक्षितपणे केलेल्या या हल्ल्यामुळे त्यांच्यासाठी आजही प्रथम क्रमांकाचे विरोधक भाजपा की राष्ट्रवादी असा प्रश्नही सध्या चर्चेला आला आहे.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस

पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा संघर्ष राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन कराड लोकसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. वास्तविक कराड हा काँग्रेस पक्षाचा तसेच चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ. परंतु त्या वेळी झालेल्या तिरंगी लढतीत कराडच्या चव्हाण परिवाराला पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव काँग्रेससाठी देखील मोठा धक्का होता.  राज्यातील काँग्रेस नेत्यांचे राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही यातून झालेला होता. पुढे पुन्हा सत्तेसाठी या दोन्ही काँग्रेस एकत्र येत त्यांनी आघाडी सरकारच्या नावाने राज्यात सत्ता उपभोगली.या दरम्यानच २०१० ते २०१४ या कालखंडात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडीचे सरकार होते. या वेळी चव्हाण यांच्या ‘सूक्ष्म’ नजरेखाली कारभार करताना राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या अडचणी वाढत गेल्या. चव्हाणांचा शिस्तीचा बडगा राष्ट्रवादीतील अनेकांसाठी अडचणीचा बनला होता. 

हेही वाचा- नगरच्या राजकीय आखाड्यात पाणी योजना मंजुरीच्या श्रेयवादाचे शड्डू

सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष्य झाली. पण त्याचबरोबर आघाडी सरकारही बदनाम झाले. यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात दोन्ही काँग्रेसमधील सघर्ष वाढला. याच दरम्यान चव्हाणांनी राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेताच या संघर्षाचा भडका उडाला. या मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण व अजित पवारांमध्ये जोरदार जुंपली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील ‘काहींच्या हाताला लकवा भरला असल्याची’ झोंबणारी टीका थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून केली होती. पुढे या सर्वांची परिणती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विभक्त होण्यात झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेतील आघाडी सरकारचा अनपेक्षितपणे पाठिंबा काढून घेतला. चव्हाणांचे सरकार पडले. १९९९ ते २०१४ असा हा चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्षाचा प्रवास पुढे सत्ता गेल्यावरही सुरूच आहे. याचेच प्रत्यंतर नुकत्याच त्यांनी केलेल्या या हल्ल्यातून आले.

हेही वाचा- उद्योगप्रश्नी केंद्राकडे दाद मागण्याचे धाडस शिंदे -फडणवीस सरकार दाखवणार का?; माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सवाल

चव्हाण यांच्या मते २०१४ साली पुन्हा राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडत सवतासुभा मांडला. त्या वेळी राष्ट्रवादीच्या या वर्तनामुळेच राज्यातील भाजपची ताकद आणि आता सर्वदूर सत्ता आली. या सगळ्याला राष्ट्रवादीचे हेच पाप कारणीभूत असल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे.पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल सर्वत्र ओळखले जातात. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर रोज टीका करतानाच त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातील उणिवांविरुद्धही ‘जी २३’ च्या माध्यमातून आवाज उठवला होता. आता या नव्या सडेतोड भूमिकेमुळे त्यांनी राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आसताना चव्हाणांनी हा हल्ला चढवल्याने येत्या काही दिवसांत यावरून दोन्ही काँग्रेसमधील हा सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.