scorecardresearch

इम्तियाज जलील: टीव्ही पत्रकार ते एमआयएमचे फायरब्रँड नेते

पक्षाने निलंबित केलेल्या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषितांच्याबद्दल केलेल्या अपमानस्पद वक्त्यव्यासाठी फाशी द्यायला हवी असे विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे.

Imtiyaz Jalil

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे ओवेसी बंधूंनंतर एमआयएममधील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहेत. केवळ आठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपला राजकीय वावर सर्वदूर पसरवला आहे.  नुकतेच इम्तियाज जलील यांनी एक खबळजनक विधान करून एका वेगळ्याच वादाला जन्म दिला आहे. पक्षाने निलंबित केलेल्या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषितांच्याबद्दल केलेल्या अपमानस्पद वक्त्यव्यासाठी फाशी द्यायला हवी असे विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे.

राजकारण येण्यापूर्वी इम्तियाज हे टीव्ही पत्रकार होते.पुण्यात ते एका हिंदी वृत्त्त वाहिनीसाठी वार्तांकन करायचे. त्यांनी २०१४ मध्ये पत्रकारीता सोडली आणि औरंगाबादच्या राजकारणात विस्तारू पाहणाऱ्या एमआयएममध्ये प्रवेश केला. २०१४ साली ते औरंगाबाद येथून आमदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांनंतर इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. इम्तियाज यांच्या रूपाने हैदरबादमधील त्यांच्या बालेकिल्ल्यापासून दूर एमआयएमने दुसरी लोकसभेची जागा जिंकली. पण एनडीटीव्ही य वृत्तवाहिनीवरील नोकरी सोडून राजकारणात येण्याचे कारण काय? २०१४ मध्ये औरंगाबाद येथील त्यांच्या घरी ‘इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हणले की “बीड जिल्ह्यातील भगवानगड ते पुणे अशी पंकजा मुंडे रॅली कव्हर करताना त्या त्यांच्या राजकीय आयुष्यात काय करतात हे चार तासांच्या प्रवासात जाणून घेतले. भगवान गडाच्या कडक उन्हात बसलेल्या म्हाताऱ्या बायका राजकीय नेत्यांनी वाट बघत बसल्या होत्या.  यावेळी मला माझ्या आयुष्याचे पुनर्मुल्यांकन करायचे होते. या दौऱ्यावरून पुण्याला परतत असताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला”. इम्तियाज यांचे कुटुंब आणि मित्रांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. मात्र जलील यांना फार काळ बेरोजगार राहावे लागले नाही. कारण एमआयएमने त्यांना औरंगाबाद मध्य या मुस्लिबहुल भागातून विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. टेलिव्हिजन रिपोर्टर म्हणून इम्तियाज यांनी मिळवलेला आदर आणि त्यांचे वडील डॉक्टर होते त्या जोरावर इम्तियाज २०,००० हुन अधिक मतांनी निवडून आले. त्यानंतर लगेचच पत्रकाराचा आमदार झालेल्या इम्तियाज यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत २५ जागा जिंकून आणल्या आणि एमआयएमच्या विरोधी पक्ष म्हणून उदयास येण्यात महत्वाची भूमिका बजावली.

२०१७ मध्ये औरंगाबादमध्ये लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या उपस्थितला जलील यांनी विरोध केला आणि एका नव्या वादात अडकले. वंदे मातरम न म्हणण्याच्या वादातही ते अडकले. लोकसभेची उमेदवारी मिळवण्यावरून इम्तियाज आणि पक्षात वाद निर्माण झाला होता. यावेळी जलील पक्ष सोडण्याचा तयारीत होते. मात्र त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे पक्षाला खूप मोठा धक्का बसला असता. त्यामुळे अखेर पक्षाने इम्तियाज यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी लागली. आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत झालेल्या लढाईत ते ४,२९२ मतांनी विजयी झाले. 

इम्तियाज जलील यांनी केलेल्या नुपूर शर्मा यांच्याबाबतच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की “आपल्या देशाच्या कायद्यानुसार त्यांना अटक झाली पाहिजे.” ओवेसी यांच्या सावध भूमिकेनंतर इम्तियाज यांनी सुद्धा सावध भूमिका घेतली. ” आमदार म्हणून मला माहित आहे की अशी जाहीर फाशी देणे निंदनीय आहे. त्यांना मथकर शिक्षा झाली पाहिजे असे मला म्हणायचे होते. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध कायदा हवा याचे मी समर्थन करतो”.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-06-2022 at 09:32 IST
ताज्या बातम्या