Congress vs RSS-BJP: भारताच्या राजकारणात काँग्रेस पक्ष पुन्हा जुना पायंडा कायम राखत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही व्यासपीठावर, कुठल्याही प्रसंगी किंवा कोणत्याही मुद्द्यांवर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसत आहे. प्रचार सभा असो, संसदेतलं भाषण असो किंवा आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी संवाद असो; काँग्रेस वारंवार संघावर टीका करताना दिसत आहे.
अनेक राज्यांमध्ये निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसने त्यांचा जुना शत्रू असलेल्या आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी कर्नाटकमध्ये याची सुरुवात झाली. कर्नाटकातील वरिष्ठ नेत्यांनी संवाद साधताना वारंवार आरएसएसचा उल्लेख केला. संघावर मोदी सरकार चालवण्याचा, संविधान उलथवण्याचा आणि संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचा आरोप केला.

राहुल गांधी आपल्याला प्रसिद्धी देत आहेत, असे संघाचे स्वयंसेवक मिश्किलपणे म्हणतात. संघाने नव्हे तर काँग्रेसनेच संघाची प्रसिद्धी सर्वाधिक केली आहे. राहुल गांधींच्या आरएसएसबाबतच्या वारंवार संदर्भांमुळे लोकांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जाणून घेण्यासाठी आणखी उत्सुकता आहे, असेही संघाच्या स्वयंसेवकांनी म्हटले आहे. अलीकडेच कर्नाटकातील काँग्रेस नेत्या प्रियंका खरगे यांच्यासह पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणेच संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. काँग्रेसचा प्रमुख राजकीय विरोधक भाजपा असला तरी काँग्रेस संघाबद्दल सातत्याने टीका करते आहे, हा मुद्दा सातत्याने समोर येतो आहे.

नेहरूंची चिंता आणि सुरुवातीचा कलह

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतासाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन परस्परविरोधी दृष्टिकोनातून जन्मलेल्या संघटना आहेत. काँग्रेसने नेहरूंच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी प्रजासत्ताक निर्माण करण्याचा प्रयत्न केला; तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ मध्ये हिंदू ओळख आणि राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने एक सांस्कृतिक चळवळ म्हणून उदयास आला.

संघाने कधीही नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारांना स्वीकारले नाही आणि हे विचार मुस्लिमांचे तुष्टीकरण असल्याचे मानले. दुसरीकडे काँग्रेसने संघाला कायम धार्मिक, प्रतिगामी आणि भारताच्या सामाजिक रचनेसाठी धोकादायक असल्याचे मानले. याच कारणामुळे नेहरूंनी १९४७ मध्ये पहिल्यांदा संघावर चार दिवसांसाठी बंदी घातली होती. संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी सांगितले की, ही बंदी नेहरूंच्या चिंतेचा परिणाम आहे. कारण संघाचे विचार लोकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचतील, असे काँग्रेसला वाटले होते. अशा मूलभूत संघर्षांमुळे संघ काँग्रेससाठी कायमच वैचारिक विरोधक ठरला आहे. असे असताना १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी चिघळली. त्यावेळी संघावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. याचे कारण म्हणजे संघाचे गांधी हत्येशी कथित संबंध जरी सिद्ध झालेले नसले तरी काँग्रेस नेत्यांच्या सार्वजनिक भाषणात नथुराम गोडसेचा उल्लेख करण्यात आला. आणि काँग्रेसने नथुरामचा मुद्दा संघाविरोधात सातत्याने वापरला.

लेखक व राजकीय विश्लेषक रतन शारदा यांनी ‘न्यूज१८’शी बोलताना सांगितले, “१९४७ नंतर काँग्रेसमध्ये आरएसएसबद्दल एक विचित्र गुंतागुंत निर्माण झाली. संघाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना चिंता वाटू लागली. कारण- संघाने कधीही निवडणुका लढवल्या नाहीत आणि काँग्रेसला शक्य न झालेल्या मार्गाने ते लोकांशी जोडले गेले आहेत. संघाच्या विरोधात काँग्रेसने प्रसंगी दडपशाहीचाही वापर केला आणि त्यांचाच वारसा सांगणारे नेतृत्त्व हाच वारसा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत.”

“काँग्रेसला वाटते आहे की, आरएसएसवर हल्ला केल्याने भाजपाला धक्का बसेल. मुस्लीम तुष्टीकरण आणि आरएसएस या दोन विषयांमुळे काँग्रेसला राजकारणात कोणताही फायदा झालेला नाही. मात्र, अजूनही ते पक्षाला सावरण्यासाठी काही नव्या युक्त्यांचा विचार करीत नाहीत.”

ठळक मुद्दे:

  • भारत-पाकिस्तान शस्त्रविरामावरून भाजपा-आरएसएसवर टीका
  • आरएसएसची अरब देशातील इस्लामिक दहशतवादी संघटना ब्रदरहुडशी तुलना
  • मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरएसएसला टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती

संघावर हल्ला

प्रत्यक्ष किंवा उघडपणे निवडणूक भूमिका नसलेली सामाजिक- सांस्कृतिक संघटना अजूनही संघ भाजपाचा वैचारिक कणा ठरलेला आहे. मतपेटीत भाजपाला पराभूत करण्यासाठी केवळ पक्षालाच लक्ष्य करणे पुरेसं नाही. काँग्रेसला संघाच्या तळागाळातील यंत्रणा, समर्पित कार्यकर्ते आणि दीर्घकालीन वैचारिक दृष्टिकोनाचा सामना करण्याची गरज आहे.

आरएसएसचा सांस्कृतिक राष्ट्रवाद काँग्रेससाठी धोका ठरत आहे का? (Photo: Indian Express)

आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याला वैचारिक कट्टरता म्हटले आहे. ते म्हणाले, “धार्मिक उदारमतवादाने वेढलेले जयराम रमेश आणि त्यांचे गट एका साधारण स्वयंसेवकाला फॅसिस्ट किंवा नवनाझी म्हणून लेबल लावतात. संघाबाबतचे असे शब्द लक्ष्यापेक्षा काँग्रेसची वैचारिक असुरक्षितता अधिक दर्शवतात.” राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते बहुतेकदा भाजपाला मुखवटा आणि आरएसएसला सिंहासनामागील खरी शक्ती म्हणून संबोधतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीबी पंत सोशल सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ राजकीय निरीक्षक बद्री नारायण यांनी म्हटले, “काँग्रेस आरएसएस जेवढी अधिक टीका करेल, तेवढीच बळकटीच्या संघाच्या कामाला आधिक्याने मिळेल. जेव्हा ते संघाविरुद्ध बोलतात तेव्हा ते मूळात त्यांच्या व्यापक सामाजिक संपर्काचा भाग असलेल्या लोकांविरुद्ध बोलत असतात. संघाला कधीही राजकीय गोंधळाची काळजी नव्हती. त्यांचा दृष्टिकोन आधीपासूनच ठरलेला आहे. त्यामुळे संघावर येता- जाता टीका करणे हे खोलवरच्या राजकीय परिणामांची समज नसल्याचे दर्शविते. उलट काँग्रेससाठी हा फक्त सुटकेचा मार्ग आहे”, असेही नारायण म्हणाले.