मराठवाड्यातील शिंदे गटाचे तिन्ही मंत्री वादाच्या भोवऱ्यात | The three ministers of the Shinde group in Marathwada are in the midst of controversy print politics news amy 95 | Loksatta

मराठवाड्यातील शिंदे गटाचे तिन्ही मंत्री वादाच्या भोवऱ्यात

‘हाफकिन’च्या अज्ञानवादातून कशीबशी सुटका झाल्यानंतर मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मराठवाड्यातील शिंदे गटाचे तिन्ही मंत्री वादाच्या भोवऱ्यात
मराठवाड्यातील शिंदे गटाचे तिन्ही मंत्री वादाच्या भोवऱ्यात

सुहास सरदेशमुख

‘हाफकिन’च्या अज्ञानवादातून कशीबशी सुटका झाल्यानंतर मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठवाड्यातील शिंदे गटातील तिन्ही मंत्री वादाच्या रिंगणात सापडले आहेत.

हेही वाचा >>> गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष ‘बंडा’मुळे गांधी कुटुंब अडचणीत

मंत्री होण्यापूर्वी ‘ टीईटी’ घोटाळयात अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आले. न्यायालयाने जमीन प्रकरणी फटकारले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न झालेल्या निर्णयाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविल्याने त्यांना झापले. रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्या आरोपाचा वाद निर्माण होण्यापूर्वी गर्दी जमविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा भुमरे यांनी दुरूपयोग केला.

हेही वाचा >>> राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी

अंगणवाडी कार्यकर्ती व पर्यवेक्षकांनी सभेला उपस्थित रहावे असे लेखी आदेशच काढण्यात आले होते. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. आता तानाजी सावंत यांच्या भोवतीही बेताल वक्तव्याचा वाद उभा राहिला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बोलताना उस्मानाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे सावंत यांनी माफी मागितली आहे. मराठवाड्यातील तिन्ही मंत्र्यांभोवती अशाप्रकारे वादाचे रिंगण पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष ‘बंडा’मुळे गांधी कुटुंब अडचणीत

संबंधित बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीच्या दोन पाटलांमधील कलगीतुरा सुरूच..
Gujarat Election 2022 : “दिल्लीतील ‘आप’चा ‘नमूना’ दहशतवादाचा…”; योगी आदित्यनाथ यांची केजरीवालांवर जहाल टीका
धनंजय महाडिक : सत्ता हाच पक्ष; भाजपच्या खासदारकीने नवीन राजकीय डाव सुरू
आशीष जयस्वाल यांच्या मंत्रिपदाला रामटेक भाजपमधून विरोध
धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले जाणार ?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हिवाळ्यात भाज्या लगेच खराब होत आहेत का? जास्त काळ ताज्या राहाव्या यासाठी वापरा ‘या’टिप्स
स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती
Tips To Reduce Electricity Bill: मस्तच! वीजबिल येईल कमी; ताबडतोब घरात बसवा ‘हे’ डिव्हाइस
लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू
पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार