मधु कांबळे

लोकसभा निवडणुकीला वर्ष-दीड वर्षाचा अवधी असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पदयात्रा सुरू केली आहे. सात सप्टेंबरला सुरू झालेल्या या पदयात्रेचे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या पाच राज्यात फिरून बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात आगमन झाले. राज्यातील पदयात्रेला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून सुरुवात झाली. यात्रेचे स्वागतच मोठ्या धूमधडाक्यात झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रभाव असलेला नांदेड हा जिल्हा.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
sunetra pawar contesting lok sabha election
मोले घातले लढाया : अस्तित्वाची लढाई
holi color
कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण

स्वागताला आणि पुढे पाच-सहा दिवस चाललेल्या पदयात्रेतही इतकी प्रचंड गर्दी होती. मात्र यात्रेचे नियोजन इतके शिस्तबद्ध होते की कुठेही त्यात विस्कळितपणा जाणवला नाही. त्या सर्व नियोजनावर आणि नांदेडमधील जाहीरसभेला झालेली मोठी गर्दी यावर अशोच चव्हाण यांची राजकीय छाप दिसली. पक्षांतराच्या चर्चा संशयात अडकलेल्या चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन तर केलेच, परंतु पक्षांतराच्या वावड्याही उडवून लावल्या. सध्या तरी एवढे दिसले, राजकारणात पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मुंबईसह ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात मराठवाड्यातील दोन व विदर्भातील तीन अशा पाच जिल्ह्यांपुरती भारत जोडो पदयात्रा मर्यादित होती, तरीही ३८० किलोमीटरचा पल्ला गाठणारी ही यात्रा राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली असे म्हणता येईल.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्रासह काही विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भाजपकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे केंद्रातील, महाराष्ट्रातील आणि अन्य काही राज्यांतील काँग्रेसची सत्ता गेली. लोकशाही शासन व्यवस्थेत असा जय-पराजय, सत्ता येणे, जाणे अपेक्षित असते. परंतु २०१९ ची लोकसभा निवडणूक ही राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून स्वतःच्या अंगावर घेतली होती, एकाकी भाजपशी झुंज दिली परंतु, त्यावेळी जो पराभव झाला होता, तो २०१४ च्या पराभवापेक्षा अधिक दारुण आणि काँग्रेसला लुळीपांगळी अवस्था प्राप्त करून देणारा होता. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची तशीच अवस्था झाली. मधल्या दोन-अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून, सत्ताप्राप्ती करून घेऊन मान टाकलेल्या काँग्रेसला जरा उठून बसता आले. त्यानंतर सत्तेचा चतकोर हिस्साही गेला, आता पुढे काय हा प्रश्न असतानाच, राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा झंझावात सुरू झाला. काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरातील ठरावानुसार भारत जोडो यात्रा सुरू केली असली तरी आणि ती राजकीय नाही असे कितीही सांगितले जात असले तरी, ती राजकीयच आहे.

हेही वाचा: अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

२०१९ मधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे, हे त्यांच्या एकूणच आव्हानात्मक वक्तव्यातून आणि कृतीतून दिसत आहे. महाराष्ट्रात पदयात्रेचे आगमन झाले तो ६१ वा दिवस होता. राहुल गांधी दररोज सात-आठ तास आणि सरासरी २५ किलोमीटर चालतात. ते केवळ चालत नाहीत, तर लोकांना ते आपल्यामागे खेचून घेतात. देशात भयानक काही तरी घडू लागले आहे, देश वाचवायचा आहे, असा सहज जाता जाता ते संदेश देऊन जात आहेत. दिवसभरची पायपीट आणि सायंकाळी पदयात्रेची सभेने सांगता हा त्यांचा दीनक्रम. सभेत ते भाषण करण्याऐवजी जमलेल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी यांना पाहण्यासाठीही सर्व समान्य माणसांची दररोज वाढत जाणारी गर्दी हा चर्चेचा विषय ठरत आहे. ही गर्दी काँग्रेसच्या बाजूने मतपेटीत कितपत उतरेल, हे आताच सांगता येणार नाही. परंतु राहुल गांधी वेगळे काही तरी सांगत आहेत, त्याच्या कुतूहल रेषाही गर्दीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. त्याचा आज नाही, परंतु काँग्रेसला उद्या नक्कीच राजकीय फायदा होऊ शकतो.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याची एखाद्या राज्यात सभा झाली किंवा अन्य कार्यक्रम झाला की, त्याचा त्या पक्षाला काय फायदा होणार अशी चर्चा सुरू होते. राहुल गांधी यांच्या पदयात्रेनेही महाराष्ट्रातील काँग्रेसला काय फायदा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. खरे म्हणजे राष्ट्रीय नेत्याच्या एखाद्या सभेने किंवा कार्यक्रमाने त्यांच्या पक्षाला त्याचा लगेच फायदा होतोच असे नाही. परंतु त्यांची विचारधारा, त्यांचा पक्षकार्यक्रम लोकांसमोर ठेवून, त्यांना आपल्याकडे वळविण्याची ती एक राजकीय प्रक्रिया असते. त्या अर्थानेच राहुल गांधी यांच्या राज्या राज्यांतून जाणाऱ्या भारत जोडो पदयात्रेकडे पाहिले पाहिजे.

हेही वाचा: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ‘फिल्डिंग’; ४० मतदारसंघातील प्रचारासाठी २९ नेते मैदानात

२०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलेली आहेत. कुणाचे कालचे मित्र आज शत्रू झाले आहेत, तर कुणाचे शत्रू मित्र झाले आहेत. भाजपने वेगळी खेळी करून महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली आहे आणि त्याचबरोबर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेतही उभी फूट पाडून पक्षनेतृत्वालाच कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत काँग्रेसची राज्यातील अवस्था तशी फार चांगली नाही, अर्थात खूप वाईटही नाही. परंतु काँग्रेसला सत्तेच्या बाहेर राहून पक्षसंघटन उभे करण्याची सवय नाही. कायम सत्तेत राहिल्याने, संघटन बांधणी करण्यासाठी त्यांना फार प्रयत्न करावे लागले नाहीत. परंतु आता परिस्थिती बदलेली आहे. संघर्षातून काँग्रेसला संघटन उभे करावे लागेल. त्यासाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रातील ३८० किलोमीटरचा प्रवास केला, त्याचा फायदा घेता येईल.

हेही वाचा: “राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

भारत जोडो पदयात्रेला अपेक्षेपक्षा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेसची नव्याने काही भूमिका मांडत आहेत. प्रामुख्याने ते चार मुद्यांवर लोकांशी संवाद साधतात. पहिला मुद्दा विचारधारेचा आहे आणि त्यावरच आधारित त्यांच्या या राजकीय अभियानाला भारत जोडो पदयात्रा असे नाव दिले आहे. ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवितात. जाती-धर्मांत द्वेष, भय निर्माण करून संघ देशाचे विभाजन करीत आहे, असा ते आरोप करतात. संघाची विचारधारा राबविणे हाच भाजपचा राजकीय कार्यक्रम आहे, त्यामुळे भाजप सत्तेवर असणे देशासाठी, लोकशाहीसाठी आणि संविधानसाठी कसे धोक्याचे आहे, हे गर्दीशी संवाद साधून ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात. विचारधारेच्या मुद्द्यावर ते भाजपच्या मुळावर म्हणजे आरएसएसवर घाव घालतात. अन्य दोन मुद्दे हे लोकांच्या थेट जगण्याशी संबंधित आहेत. महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न आणि त्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची धोरणे कशी जबाबदार आहे ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. भारत जोडो हे राष्ट्रीयस्तरावरील राजकीय आंदोलन असतानाही आणि गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला कसे गेले आणि त्यामुळे या राज्यातील तरुणांचे रोजगार कसे हिरावले गेले यावर थेट भाष्य करून त्यांनी महाराष्ट्रातील युवकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, हे विशेष आणि काहीसे धाडसाचे आहे, असे म्हणावे लागेल.

हेही वाचा: राहुल गांधींच्या पदयात्रेत महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा वाहनातून प्रवास

चौथा मुद्दा सध्याचे जे देशातील भयाचे वातावरण आहे, भाषणाच्या शेवटी डरो मत, अशी जमलेल्या जनसमुहाला ते साद घालतात आणि घाबरलेल्या काँग्रेसलाही भय देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या भाषणात ते मोदी आणि आरएसएसवर तिखट हल्ला चढविताना दिसतात. राहुल गांधींची ही भाषा महाराष्ट्रातील काँग्रेस बोलणार आहे का आणि त्यातून त्यांना काही राजकीय फायदा होईल का, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर यथावकाश आगामी निवडणुकांमध्ये मिळेलच. परंतु तूर्तास राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेने, काँग्रेसमधील गटा-तटात विखुरलेले संघटन एकत्र आलेले दिसले. आपले काय होणार हे काँग्रेसजनांमधील भय काहिसे निघून गेल्याचे दिसले. एक सावरकरांवरील वादाचा विषय सोडला तरी, राहुल गांधी यांच्या पदयात्रेने महाविकास आघाडीच्या नव्या समीकरणाला कुठे धक्का लागू दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेतेही राहुल यांच्या बरोबरीने पदयात्रेत सहभागी होऊन, त्यांनी काँग्रेसला समर्थनच दिले. त्या अर्थाने राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील दोन आठवड्याच्या झंझावाती दौऱ्यामुळे काँग्रेसमध्ये काहीसे नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे म्हणता येईल, नव्हे तसे ते दिसलेही. अर्थात त्यामुळे काँग्रेसची ताकद किती वाढेल याचे मोजमाप आताच करता येणार नाही, परंतु महाराष्ट्रातील आघाडीचे राजकारण असो की, स्वतंत्रपणे वाटचालीचे असो, काँग्रेसचा आवाज वाढलेला दिसेल आणि तो ऐकला जाईल, एवढेच सध्या म्हणता येईल.