राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक | Three day meeting of BJP on important issues in the state print politics news amy 95 | Loksatta

राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात भाजपची महत्त्वाची भूमिका आहे.

राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक
राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक

उमाकांत देशपांडे

राज्यातील महत्त्वाचे राजकीय, सामाजिक विषय आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विचारमंथन करण्यासाठी भाजपची राज्य स्तरीय चिंतन बैठक ७, ८ व ९ ऑक्टोबरला उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांच्यासह काही वरिष्ठ केंद्रीय नेते या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा >>> शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात भाजपची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना या सरकारकडून पुढील काळात काय अपेक्षा आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर आपली कशी व काय भूमिका असावी, भाजपची ध्येयधोरणे राबवीत निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून सरकारच्या कामगिरीचा प्रचार करावा, याबाबत विचारमंथन होणार आहे. भाजपची मूळ भूमिका, विचार आणि कालानुरूप घेतल्या गेलेले निर्णय, देशांतर्गत राजकीय परिस्थिती आदींबाबत वेगवेगळ्या सत्रांमध्ये तीन दिवस विचारमंथन होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजपचे मंत्री यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील नेते, राज्य पदाधिकारी, भाजपचे राज्यातील सर्व खासदार, आमदार आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
विधानसभा अध्यक्षांना जयंत पाटील यांनी ऐकवले खडे बोल
अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराची चर्चा; मुंबई- पुण्यात होकाराची तर नांदेडमध्ये नकाराची
सांगलीत भाजपला यश मिळवून देण्याचे नव्या पालकमंत्र्यांसमोर आव्हान
Gujarat Election: मेधा पाटकर ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्यावरून पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेसकडून प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड
विश्लेषण: नीति आयोग: त्यांचा आणि आपला..
ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत
ब्राझीलसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान
भारत-बांगलादेश एकदिवसीय मालिका: बांगलादेशचा भारतावर रोमहर्षक विजय