तृणमूल काँग्रेसचे चतुरस्त्र आणि आक्रमक नेते आता सीबीआयच्या जाळ्यात

अनुब्रता मोंडल यांना गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसचे चतुरस्त्र आणि आक्रमक नेते आता सीबीआयच्या जाळ्यात

तृणमूल काँग्रेचे नेते आणि पक्षाचे बीरभूमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुब्रता मोंडल यांना गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. मोंडल यांना गोवंश तस्करी प्रकरणात सीबीआयने  समन्स बजावले होते. आठवड्याच्या सुरुवातीला सीबीआयने त्यांना किमान आठ समन्सला बजावले. मा्त्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत मोंडल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले

मोंडल यांना राज्यात केसतोडा म्हटले जाते. ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जातात, इतर मंत्री आणि अनेक आमदारांपेक्षा राज्यात मोंडल यांचा दबदबा अधिक आहे. बीरभूममध्ये त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. जिल्ह्य़ातील त्यांच्या भव्य घरामध्ये टीएमसीच्या जिल्हा पक्ष कार्यालयापेक्षा जास्त गर्दी होते.

अनुब्रता मोंडल ज्यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढविली नाही, ते बीरभूमसाठी टीएमसीचे रणनीतीकार आहेत.  त्यांनी पडद्याआडून पक्षाचे व्यवस्थापन करण्यास प्राधान्य दिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीने जिल्ह्यातून बीरभूम आणि बोलपूर या दोन्ही जागा जिंकल्या. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने या निकालाची पुनरावृत्ती केली, जेव्हा त्यांनी जिल्ह्यात ११ पैकी १० जागा जिंकल्या तेव्हा या कामगिरीचे श्रेय मंडल यांच्या बूथ व्यवस्थापन कौशल्याला दिले गेले. प्रत्येक निवडणुकीत, ते मतदारांवर प्रभाव टाकू शकतात अशा तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कडक पाळत ठेवली होती.

मूळचे शेतकरी कुटुंबातील असणारे ६२ वर्षीय टीएमसी नेते मोंडल  हे तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत सोबत आहेत. २०१३ च्या पंचायत निवडणुकीच्या वेळी त्यांची बलवान प्रतिमा प्रथम प्रकाशाझोतात आली. ममता बॅनर्जी पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांनी मोंडल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांवर बॉम्ब फेकण्यास आणि अपक्ष उमेदवारांची घरे जाळण्यास सांगितले. कालांतराने, मोंडल हे त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेकदा पोलिसांना उघड धमक्या दिल्या

लोकांना धमकावणे, खून आणि वाळू, दगड आणि गुरांची तस्करी यांसह अनेक प्रकरणांमध्ये मोंडल यांचे नाव कायम येत असले तरी त्यांच्यावर क्वचितच खटला चालवला गेला आहे. गुरांच्या तस्करी प्रकरणात मोंडल यांना अटक करण्यात आली आहे,. सीबीआयने सांगितले आहे की जे नेते आणि सरकारी अधिकारी यांना गोवंश तस्करीच्या कमाईतून फायदा झाला त्या सर्वांवर कारवाई करणार. फेब्रुवारीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील टीएमसीच्या कार्यकारिणीत एकमेव जिल्हास्तरीय नेत्याचा समावेश करण्यात आला आहे. मोंडल हे चटीएमसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc leader anubrata mondal is on the radar of cbi pkd

Next Story
पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पहिले नाव माझेच-आमदार भरत गोगावले
फोटो गॅलरी