संतोष प्रधान

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमाविले असले तरी मतदारांचा पाठिंबा कायम राखण्याचे उद्धव ठाकरे गटापुढे मोठे आव्हान असेल. शिवसेनेला राज्यात सरासरी १५ ते २० टक्क्यांच्या आसपास मते मिळतात व ही मते शिंदे गटाकडे जाणार नाहीत याची खबरदारी ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे.

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
prakash javadekar kerala lok sabha marathi news
केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास
kolhapur lok sabha marathi news, kolhapur narendra modi rally
कोल्हापुरात अखेरच्या टप्प्यात मोदी, योगी, पवार, ठाकरे यांच्या सभांचे आयोजन
former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका

शिवसेनेची एक हक्काची मतपेढी तयार झाली. आधी मराठी मग हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने शिवसेनेचा हक्काचा मतदार तयार झाला. मुंबई, ठाणे परिसरात शिवसेनेने चांगले वर्चस्व निर्माण केले. कोकण, मराठवाडा, खान्देशात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट झाली. १९९० पासून शिवसेनेचे प्रत्येक निवडणुकीत ५० पेक्षा अधिक आमदार निवडून आले आहेत. भाजपबरोबरील युतीचा उभयतांना फायदा झाला होता.

हेही वाचा… सांगलीत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच सारा निधी

हेही वाचा… Maharashtra News Live: पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा; पवार म्हणाले…

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. कायदेशीर लढाईला ठाकरे गटाला सामोरे जावे लागेल. पण त्याचबरोबर राजकीय पातळीवर ठाकरे यांना पक्षाचा हक्काचा मतदार तसेच सहानुभूतीदार यांना सांभाळण्याचे काम करावे लागेल. शिवसेनेला मिळणारी मते शिंदे व भाजपकडे वळणार नाहीत याकडे आता अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कायदेशीर लढाईत हरले तरी मतदारांच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या लढाईत जिंकल्यास ठाकरे गट तारू शकेल. अन्यथा ठाकरे गटाचे अस्तित्वच धोक्यात येईल.