संजीव कुळकर्णी

नांदेड : नांदेड-नायगाव-नर्सी ते देगलूर या ८० कि.मी. अंतराच्या पट्ट्यात ठिकठिकाणी तसेच नांदेड-देगलूर महामार्गावर दुतर्फा शेकडो स्वागत फलक उभे आहेत. काँग्रेसचे हाताचे चिन्हही मिरविले जात आहे. तिरंगा ठिकठिकाणी फडकत आहेत. राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचे श्रीमंतांचे छायाचित्र असलेले फलक दिसत आहेत… अशारितीने आज महाराष्ट्र-नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला आहे.

Satyajeet tambe and vishal patil
सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, सत्यजीत तांबेंचं भूमिकेला समर्थन; काँग्रेसला सल्ला देत म्हणाले, “अजूनही…”
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

काँग्रेसचे राज्यातील सारे नेते डेरेदाखल झाले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान लागणाऱ्या सर्व व्यवस्थांवर अशोक चव्हाण आणि त्यांचा चमू बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेले दोन महिने ज्या प्रसंगाची प्रतीक्षा नांदेडमधील काँग्रेसचे नेते करत होते तो क्षण जवळ आल्याने आता लगबग वाढली आहे.

हेही वाचा… भारत यात्रेत राहुल गांधींबरोबर चालताना सर्फराज काझीला दिसले बेरोजगारीचे विक्राळ रूप

‘भारत जोडो यात्रा’ सायंकाळी जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वेगवेगळ्या स्तरांवरील नेते-कार्यकर्त्यांची धावपळ, लगबग सकाळपासूनच सुरू झाली. या यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, राज्यातले अनेक माजी मंत्री, यात्रेचे राज्याचे समन्वयक बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदार, नांदेड शहर-जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.

हेही वाचा… राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आज महाराष्ट्रात आगमन

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील आगमन नांदेड जिल्ह्यात देगलूरला होणार, ही बाब सुमारे तीन महिन्यांपूर्वी स्पष्ट झाली. तसेच या यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील प्रवास सुमारे सव्वाशे कि.मी. असल्याचे त्यानंतर निश्चित झाल्यावर प्रदेश काँग्रेसने नांदेडमध्ये प्रमुख नेते अशोक चव्हाण यांच्या हाती व्यवस्था व नियोजनाचे सुकाणू सोपविले.

हेही वाचा… महेश खराडे : रस्त्यावरच्या लढाईतील योध्दा

जिल्ह्यात यात्रेचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरील बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे जबरदस्त प्राबल्य असल्यामुळे चव्हाण यांना नियोजनात मोठे बळ उपलब्ध होते. सकाळपासूनच अशोक चव्हाण यांची लगबग सुरू झाली. शिवाजीनगरातल्या आपल्या निवासस्थानातूनच त्यांनी पुढील नियोजनाची सूत्रे हलविण्यास सुरूवात केली. बाहेर गावाहून नांदेडमध्ये दाखल होणार्‍या प्रमुख नेत्यांची पुढील व्यवस्था, मुंबई-दिल्लीहून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी संख्या आता नांदेडमध्ये आहे. सामांन्य माणसांमध्येही यात्रे विषयी कमालीचे औत्सुक्य असल्याचे दिसून येत आहे. तशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. फलक, स्वागत कमानी उभ्या राहिल्या आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : ‘भारत जोडो’ यात्रा आज राज्यात; महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

नांदेड ते देगलूर या मार्गावर यात्रेचे दोन मुक्काम राहणार आहेत. तेथील निवास, भोजन व इतर व्यवस्थांची पाहणी करत करत चव्हाण दुपारनंतर देगलूर शहरात पोहचले. त्यांच्यासोबत व पाठोपाठ अन्य अन्य नेत्यांनीही देगलूर शहराकडे प्रयाण केले. सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीद्वय नांदेडला येणार किंवा कसे, याबद्दल आधी कोणतीही घोषणा झाली नव्हती; पण हे दोन्ही नेते मंगळवारी सकाळी येथे दाखल झाले.

हेही वाचा… राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’त रायगडच्या नंदा म्हात्रेंचा सहभाग

भारत जोडो यात्रेतील सव्वाशे भारतयात्री व इतर कार्यकर्त्यांच्या निवास-भोजन व्यवस्थेसाठी शंकरनगर ता. बिलोली येथे गोदावरी मनार चॅरिटेबल पब्लिक ट्रस्टच्या अधिपत्याखालील विस्तीर्ण जागेत सुसज्ज व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तेथील पंचवीस हजार चौरस फूटाच्या भव्य मंडपात ५०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच परिसरात सुमारे १००० चौरस फूटाचा सुसज्ज भोजन मंडप उभारण्यात आला असून एकाचवेळी तेथे ५०० जणांना खुर्चीवर बसून भोजन करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन भास्करराव खतगावकरांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील सांभाळत आहेत.

हेही वाचा… EWS Quota Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब

देगलूरमध्ये भारत जोडो यात्रेचे आगमन झाल्यानंतर शहराच्या प्रवेशद्वारावरच खा.राहुल गांधी व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आजूबाजूचा परिसर, स्वागत फलक व इतर बाबींनी सजविण्यात आला आहे. आ.अमरनाथ राजूरकर, आ.जितेश अंतापूरकर व इतरांचा एक चमू सकाळपासूनच तेथील व्यवस्थेमध्ये सज्ज दिसून आला.

एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनात स्थानिक काँग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध केल्या जाणार्‍या जाहिरातींमध्ये आजवर अशोक चव्हाण यांच्यासोबत आजी-माजी आमदारांसह स्थानिक पदाधिकार्‍यांची छायाचित्रे प्रकाशित केली जात असत. पण भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्र आगमनाच्या जाहिराती तयार करताना अशोक चव्हाण यांच्यासोबत राजकीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर असलेल्या त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचेच छायाचित्र सर्वत्र झळकेल, याची दक्षता चव्हाणांच्या काही निकटवर्तीयांकडून घेण्यात आली. श्रीजया अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर इतर वृत्तवाहिन्यांनीही त्याची दखल घेतली होती.