ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस पक्षाने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी (०५ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तृणमूलने २ लाख नोकऱ्या, चौथी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपये तसेच बेरोजगार तरुणांसाठी समाजकल्याण योजनांचं आश्वासन दिलं आहे.

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्यापासून (६ फेब्रुवारी) त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशी पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्रिपुरामध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तृणमूल कांग्रेस पक्ष त्रिपुरातल्या २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Congress manifesto
३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही

त्रिपुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू म्हणाले की, “आमचा पक्ष त्रिपुरात सत्तेवर आला तर आम्ही पहिल्याच वर्षी ५०,००० नवीन नोकऱ्या देऊ, पाच वर्षांत २ लाख रोजगारांची निर्मिती करू. तसेच सरकारी विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरली जातील.”

हे ही वाचा >> रामचरितमानस वादात मायावतींची उडी, म्हणाल्या, “संविधान हाच उपेक्षितांचा ग्रंथ”, गेस्ट हाऊस प्रकरणावरून अखिलेश यादवांना टोला

शाळकरी विद्यार्ध्यांना स्टायपेंड

बसू म्हणाले की, “तृणमूलकडून बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपयांची मदत दिली जाईल. पदावरून हटवलेल्या १०,३२३ शिक्षकांनाही याचा लाभ मिळेल. त्यांच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना देखील दर महिन्याला १,००० रुपये दिले जातील. तृणमूल काँग्रेसने एक कौशल्य विद्यापीठ, विद्यार्थी क्रेडिट कार्ड आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक १,००० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.”