राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी घेतला मोठा निर्णय, पक्षाचं नाव बदलताच भाजपा, काँग्रेसची सडकून टीका | trs party name change in brs bjp congress criticizes | Loksatta

राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी घेतला मोठा निर्णय, पक्षाचे नाव बदलताच भाजपा, काँग्रेसची सडकून टीका

तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवले आहे.

राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी घेतला मोठा निर्णय, पक्षाचे नाव बदलताच भाजपा, काँग्रेसची सडकून टीका
केसीआर (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे तेलंगाणा राष्ट्र समिती हे नाव बदलले असून पक्षाला भारत राष्ट्र समिती असे नवे नाव दिले आहे. दरम्यान, बी विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीचे शिष्टमंडळ लवकरच निवडणूक आयोगाला भेटणार असून पक्षाच्या बदललेल्या नावाची नोंद घेण्याची विनंती केली जाणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या संविधानातही बदल केला जाणार आहे. दरम्यान, केसीआर यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलल्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपाकडून सडकून टीका केली जात आहे.

हेही वाचा >> ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधीही सहभागी; राहुल गांधीसोबत केली पदयात्रा

के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी टीआरएसच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत जनता दल (सेक्यूसर) पक्षाचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे २० आमदारही या बैठकीला उपस्थित होते. तामिळनाडूतील विदुथलाई चिरूथाईगल काटची पक्षाचे नेते थिरुमावालावन हेदेखील त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांसह या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत २००१ साली स्थापन झालेल्या टीआरएस या राज्य पातळीवरील पक्षाचे राष्ट्रीय पक्षात रुपांतर करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीआधी चंद्रशेखर राव यांनी कुमारस्वामी आणि थिरुमावालावन यांच्यासोबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार भारत राष्ट्र समिती आणि जनता दल (सेक्यूलर) पक्ष कर्नाटकमधील निवडणूक एकत्र लढवणार आहेत.

अपहरण, हत्या अन् फळबागेत मृतदेह; अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ, जाणून घ्या काय घडलं?

दरम्यान, के चंद्रशेखर राव यांनी पक्षाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवंथ रेड्डी यांनी केसीआर यांच्या पक्षात तेलंगाणा नाव होते. या नावामुळे तो पक्ष तेलंगाणा राज्यातील लोकांचे प्रतिनिधीत्व करायचा असे वाटायचे. तेलंगाणा ही ओळख आहे. या नावाशी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. पक्षाच्या नावातून तेलंगाणा हा शब्द काढून चंद्रशेखर राव यांनी या भावनांचा अनादर केला आहे. पक्षाचे तेलंगाणाशी असलेले नाते त्यांनी तोडले आहे, अशी टीका केली. भाजपानेही केसीआर यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत अनेक पक्षांनी आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी पक्षाचे नाव बदलले आहे. या प्रयत्नात अनेकांना अपयश आलेले आहे. केसीआर यांनी पक्षाचे नाव बदलल्यामुळे त्यांच्या हातातून राज्य निसटेल, असा दावा तेलंगाणामधील भाजपाचे मुख्य प्रवक्ते के कृष्णा सागर राव यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पाच वर्षानंतरही अजित पवारांच्या मनात पिंपरीतील राष्ट्रवादीच्या पराभवाचे शल्य

संबंधित बातम्या

हरीश बैजल : राजकीय बदल्यांच्या सावटातील लढाई अन् कर्तृत्वाची मोहोर!
के.चंद्रशेखर राव यांची सावध भूमिका, दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीकडे फिरवली पाठ
विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची चलाखी शिंदे गटासाठी अडचणीची
मेट्रो ३, समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर ; भाजपाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेग घेणार
विजयादशमीला संघाच्या नागपूर इथल्या शस्त्रपूजन कार्यक्रमाला पाहुण्यांच्या यादीत प्रथमच महिलेला स्थान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई:अद्भुत विश्वचषकात आणखी किती धक्के?
मुंबई: राज्यात स्वतंत्र अपंग कल्याण विभाग, मुख्यमंत्र्यांची घोषणा; ११४३ कोटी रुपयांची तरतूद
उद्योगांसाठी देशात महाराष्ट्र अव्वल; ‘ब्रिटन-भारत व्यवसाय परिषद’चा अहवाल
राज्यपालांची उचलबांगडी करा!; उदयनराजे भोसले यांची मागणी
…अन् दोन्ही जुळ्या बहिणींनी एकाच वराच्या गळ्यात घातली वरमाला; अकलूजमध्ये पार पडला अनोखा विवाह