नवी दिल्ली : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची येथे भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक झाली.

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे यांच्याबरोबर त्यांची पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही होते. ठाकरे यांनी कपिल सिब्बल यांचीही येथे भेट घेतली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा राजधानीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर ठाकरे मुंबईत परतले.

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
ashok Chavan and congress leader d p sawant
अशोक चव्हाण- डी. पी. सावंत प्रथमच ‘आमने-सामने’
maharashtra bjp stages protest against rahul gandhi over quota remarks
राहुल गांधींविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन; आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा बावनकुळे
Congress stays away from power can there be happiness in country
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
President rule, Balasaheb Thorat,
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी

हेही वाचा >>> कारण राजकारण : घटत्या मताधिक्याची भरत गोगावलेंना चिंता

सुनीता केजरीवाल यांना आश्वासन

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. बैठकीला आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि राघव चढ्ढा देखील उपस्थित होते. उद्धव यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, ‘या कठीण काळात सर्वजण त्यांच्याबरोबर आहेत.’

उपराष्ट्रपतींशी संवाद

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे गेले तीन दिवस दिल्लीत आहेत. उपराष्ट्रपतींनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.