हिंदुत्वावरून भाजप लक्ष्य | uddhav thackeray criticize bjp on hindutva issue print politics news amy 95 | Loksatta

Dasara Melava 2022 : हिंदुत्वावरून भाजप लक्ष्य

Dasara Melava 2022 : महाविकास आघाडीत सत्ता भोगून शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली, अशी टीका भाजपकडून केली जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

Dasara Melava 2022 : हिंदुत्वावरून भाजप लक्ष्य
हिंदुत्वावरून भाजप लक्ष्य

सौरभ कुलश्रेष्ठ

महाविकास आघाडीत सत्ता भोगून शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली, अशी टीका भाजपकडून केली जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. यासाठी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मशीद भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पाकिस्तान भेट यावरून भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जो देशाभिमानी आहे तो कोणत्याही धर्माचा असला तरी आपला हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे, अशी हिंदुत्वाची सर्वसमावेशक भूमिका मांडली. देशात भाजप हा एकच पक्ष राहील ही भाजपची भूमिका भारत मातेला हुकूमशाहीकडे नेणारी व गुलामगिरीत लोटणारी असल्याचा सावधगिरीचा इशारा देत, शिवसैनिकांच्या मनातील आगीतून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा वणवा पेटवत गद्दारांना-खोकासुरांना निवडणुकांमध्ये भस्मसात करण्याचे आवाहन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढेही शिवसेना आक्रमकपणे शिंदे-फडणवीस सरकारशी लढणार हा आत्मविश्वास शिवसैनिकांना दिला.

हेही वाचा >>>मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले

दुसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमलेल्या गर्दीला वाकून नमस्कार करत आणि हे विकत मिळत नाही ओरबडून घेता येत नाही असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील एकाही नेत्याचे नाव न घेत आपण त्यांना किंमत देत नाही असे ठाकरे यांनी दर्शवले. तसेच होय गद्दारच, हा कपाळावरील शिक्का कधी पुसता येणारी नाही असे सुनावताना त्यांच्यासाठी गद्दार, तोतये, खोकासुर, ५० खोक्यांच्या रावणाचे दहन असे शब्द प्रयोग करत शिवसैनिकांच्या आक्रमकतेला बळ दिले व त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

आम्ही कायदा पाळायचा व तुम्ही डुकरे पाळायची हे कसे चालेल? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करताना ठाकरे कुटुंब घाबरत नाही हा सुप्त संदेश देत शिवसैनिकांनाही लढण्यासाठी आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला.

गाईवर बोलण्याऐवजी महागाईवर बोला असे आवाहन करत, डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाचा उल्लेख करत आणि वाढती बेरोजगारी, विषमता यावर मोदी सरकारला आरसा दाखवल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांचे अभिनंदन करत सर्वसामान्य ना भेडसावणाऱ्या आर्थिक प्रश्नांबद्दल शिवसेना संवेदनशील असल्याचा संदेश ठाकरे यांनी दिला.

उत्तराखंडमधील अंकिता भंडारी व गुजरातमधील बिल्किस बानो या महिला अत्याचारांच्या प्रकरणात भाजपशी संबंधित मंडळी गुंतल्याकडे लक्ष वेधत महिला शक्तीच्या गौरवाचा मुद्दा मांडणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांना व भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा >>>एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

देशात सगळे पक्ष संपतील केवळ भाजपच राहील या आशयाच्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विधानाचा दाखला देत ही भारतमातेला हुकूमशाहीकडे व गुलामगिरीकडे नेणारी राजवट असल्याचा सावधगिरीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसैनिकांच्या मनातील आगीतून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा वणवा पेटवण्याचा आणि गद्दारांना निवडणुकीमध्ये भस्मसात करण्याचा आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त करत आपण संघर्षाला आणि बंडखोरांना धडा शिकवायला सज्ज असल्याचा व शिवसेना आक्रमकच राहील हा संदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि विरोधकांना दिला.‌

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये लोकप्रिय घोषणांनी काँग्रेसला तारले; प्रियंका गांधींच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश
पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या आरोपानंतर आता जावयाच्या कंत्राटावरून संदीपान भुमरे अडचणीत
बीड जिल्ह्यात रजनी पाटील यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष कुपोषित; मतदान यंत्रावरून हाताचा पंजा जणू गायबच
निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता
निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का! तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेशमधील पराभवावर पंतप्रधान मोदींनी केलं भाष्य; म्हणाले…
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले, “आम्ही केवळ…”
“देशासमोर आव्हानं असताना, जनतेचा विश्वास भाजपावर”, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी कधीच काँग्रेसला…”
Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल