संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे १९ वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला. पाच वर्षांचा कायर्काळ पूर्ण होण्यापूर्वी पायउतार झालेले ठाकरे हे आणखी एक मुख्यमंत्री ठरले. वसंतराव नाईक व देवेंद्र फडणवीस या दोघांनीच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अन्य १७ मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक यांनी सर्वाधिक ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदी दीड वर्षे मिळाली होती. विलासराव देशमुख यांनी आठ वर्षे, शरद पवार यांनी सुमारे सात वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी भूषविले. शरद पवार यांनी चार वेळा तर विलासरावांनी दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. शंकरराव चव्हाण यांची दोनदा मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती आणि त्यांनी सव्वा चार वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यांचे पूत्र अशोक चव्हाण यांना जवळपास दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली.

मुख्यमंत्री व त्यांचा कायर्काळ –

यशवंतराव चव्हाण – अडीच वर्षे
मारोतराव कन्नमवार – एक वर्ष
वसंतराव नाईक – ११ वर्षे
वसंतदादा पाटील – सव्वातीन वर्षे
बॅ. ए. आर. अंतुले – सव्वावर्ष
बाबासाहेब भोसले – एक वर्ष एक महिना
शिवाजीराव निलंगेकर पाटील – २८२ दिवस
सुधाकरराव नाईक – दीड वर्षे
मनोहर जोशी – चार वर्षे
नारायण राणे – २५९ दिवस
विलासराव देशमुख – आठ वर्षे
सुशीलकुमार शिंदे – पावणे दोन वर्षे
अशोक चव्हाण – दोन वर्षे
पृथ्वीराज चव्हाण – पावणेचार वर्षे
देवेद्र फडणवीस – पाच वर्षे
उद्धव ठाकरे – अडीच वर्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray one more chief minister who not completed his term print politics news asj
First published on: 30-06-2022 at 12:41 IST