दयानंद लिपारे

कोल्हापूर : राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याची तयारी करत आहे, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात केले. यानंतर महाविकास आघाडी (मविआ) निवडणुकीसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप व मित्र पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नेत्यांनीही अशी भूमिका घेतली असल्याने महाविकास आघाडीच्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाल्याचे दिसत आहे.

lok sabha election 2024, nagpur district collector, offices, education institutes
लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
yavatmal pm narendra modi marathi news, yavatmal lok sabha election marathi news, yavatmal bjp marathi news, yavatmal eknath shinde shivsena marathi news,
मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

राज्यात गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप यांनी एकत्रित राजकारण केले. २०१९ मध्ये राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला असता शरद पवार यांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमध्ये शिवसेना हा नवा घटक सहभागी होऊन ‘मविआ’ या नव्या आघाडीकडून शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. गेल्या जून मध्ये शिवसेनेत फूट पडली. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचा निर्णय शिक्षक संघटनांनी धुडकावला

आता आगामी निवडणुकीच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय सारीपाटावर प्रकाश आंबेडकर- जोगेंद्र कवाडे असे नवे मैत्र जुळवण्याचे प्रयत्नही दोन्हीबाजूने सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौरा वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले लढणार असल्याचे महत्त्वपूर्ण विधान केल. यावेळी जिल्ह्यातील उभय काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. त्यानुसार जिल्ह्यात या दिशेने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा >>> राज्यातील आणखी एका राजकीय घराण्यात बेबनाव

महाविकास आघाडी स्थापन होण्याआधीच ती जिल्ह्यात कोल्हापूर महापालिकेच्या सत्ताबंधनात बांधली गेली होती. तिला साकार रूप मिळाल्यावर पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून जिंकली होती. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली असताना यश खेचून आणले होते. जूनमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मविआ एकत्र सल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दोन महत्त्वाच्या पालिकांमध्ये वेगवेगळी विधाने केली होती. गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत देणार असल्याचे त्यांनी मे महिन्यात सांगितले होते. गेल्या महिन्यात इचलकरंजी महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाचा महापौर करण्याचा इरादा व्यक्त केला होता. यामुळे महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यात कसे एकत्र येणार याची चर्चा आहे. तथापि, पवार यांची भूमिका पाहता मुश्रीफ हे मविआ म्हणून एकत्रित असणार हे उघड आहे.

हेही वाचा >>> विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पणासाठी पालकमंत्र्यांच्या परवानगीची सक्ती

इचलकरंजीत विरोधक सक्रिय- सत्ताधारी थंड

शरद पवार यांच्या दौऱ्याची फलनिष्पत्ती म्हणून इचलकरंजीकडे पहिले जात आहे. इचलकरंजी येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह काही मित्र पक्षांची बैठक होऊन महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका ‘मविआ’च्या झेंड्याखाली लढण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात ‘मविआ’ची एकत्रित ताकद मोठी असल्याने निवडणुकीत यशाचे तोरण बांधण्याचा त्यांचा इरादा विरोधकांना चिंता करायला लावणारा आहे. ‘मविआ’ने एकत्र येण्याची भूमिका मांडली असताना इचलकरंजी महापालिकेच्या दृष्टीने अद्याप भाजप -शिंदे छावणीत अद्याप ठळक हालचाली झालेल्या नाहीत. आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिकेची निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याचा इरादा वारंवार व्यक्त केला आहे. इचलकरंजी लगतच्या ग्रामपंचायत निवडणुक आमदार आवाडे – भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या गटाने एकत्रित लढवली होती. निकालानंतर ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार भाजप कार्यालयात स्वतंत्रपणे करण्यात आला. अजूनही आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षाच आहे. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, इचलकरंजीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडूनही निवडणुकी बाबतची हालचाल थंडबस्त्यातच आहे. मविआने कंबर कसली असताना भाजप -शिंदे गटात अजूनही थंड वारे वाहत आहे.