UP Civic Polls: गुजरातमध्ये स्टार प्रचारकाची भूमिका निभवात असताना, योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात | UP Civic Polls Yogi Adityanathani who is a star campaigner in Gujarat starts campaigning in Uttar Pradesh also msr 87 | Loksatta

UP Civic Polls : गुजरातमध्ये स्टार प्रचार असणाऱ्या योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात

डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

UP Civic Polls : गुजरातमध्ये स्टार प्रचार असणाऱ्या योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्येही केली प्रचाराला सुरुवात
(फोटो सौजन्य-पीटीआय)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार करण्यास गुजरातमध्ये स्टार प्रचारक म्हणून जात आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या गृहराज्यात म्हणजेच उत्तर प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारालाही सुरूवात केली आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री योगींनी सात नगरपालिकांध्ये संबोधित केले –

मुख्यमंत्री योगी यांनी आतापर्यंत सात नगरपालिकांमध्ये सभांना संबोधित केले. निवडणकीच्या तारखांची घोषणा होण्याअगोदर उर्वरीत दहा नगरपालिकांमध्ये पोहचण्याची त्यांची योजना आहे.

रविवारी मुख्यमंत्री योगी यांनी अशाच एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी १ हजार ०५७ कोटी रुपयांच्या ४६ विकास प्रकल्पांचे उद्धाटन केले. तत्पूर्वी फिरोजाबाद, अलीगढ, प्रयागराज, झाशी, गाझियाबाद, गोरखपूर आणि सहारनपूर येथे अशाच प्रकारच्या सभा झाल्या. ज्यामध्ये योगींनी अनेक प्रकल्पांचे उद्धाटन केले आणि ५ हजार ८८० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अशाच एका सभेला ते आज आग्रा येथे संबोधित करणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘नमूना’ म्हणत टीका केली आहे. गुजरातमधील एका सभेला योगी आदित्यनाथ संबोधित करत होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी २०१६ साली पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच, केजरीवाल दहशतवादाचे खरे समर्थक असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:34 IST
Next Story
“भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!