उमाकांत देशपांडे

मुंबई: शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांच्याकडे केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने म्हणजे दोन-तीन महिन्यात निर्णय घेण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

नार्वेकर हे लंडन दौऱ्यावरून सोमवारी परतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ‘ मातोश्री ‘ निवासस्थानी बैठक घेतली. तेव्हा शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी आक्रमक होऊन अध्यक्षांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अँड. अनिल परब यांच्यासह काही नेते व पदाधिकारी अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणार आहेत.

आणखी वाचा-Karnataka Election : ज्या जागांवर नरेंद्र मोदींचे भाषण, रोड शो झाले, तिथे काय घडलं? भाजपाचा विजय की पराभव? जाणून घ्या…

ठाकरे गटाने शिंदे गटातील १६ आमदारांविरोधात सर्वप्रथम अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या. त्यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीसाही काढल्या होत्या. शिंदे गटातील उर्वरित आमदारांविरोधात ठाकरे गटाने तर ठाकरे गटातील १४ आमदारांविरोधात आदित्य ठाकरे वगळून शिंदे गटाने अपात्रत्रतेच्या याचिका सादर केल्या आहेत. १६ आमदारांना नोटीसा बजावल्यानंतर त्यांच्यापैकी काहींनी उत्तरे सादर केली आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिला होता. त्यामुळे या याचिकांवर तातडीने आणि उर्वरित याचिकांवर दोन-तीन महिन्यात निर्णय द्यावा, यासाठी ठाकरे गटाकडून अध्यक्षांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

अध्यक्षांनी सुयोग्य वेळेत निर्णय द्यावा. त्यामुळे त्यांना वेळकाढूपणा करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाच्या निकालपत्राच्या प्रतीसह ठाकरे गटाकडून अध्यक्षांना निवेदन दिले जाणार आहे.