आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे. येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, येथे प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) संस्थापक शिवपाल यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. जन्माष्टमीचा मुहूर्त साधून शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल आहे. उत्तर प्रदेशमध्ये काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा >>> “आगामी लोकसभा निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी,” मनिष सिसोदिया यांचे मोठे विधान

उत्तर प्रदेशमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. यादव समाजातील लोकांची श्रीकृष्णाप्रती अमाप श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर कंस, श्रीकृष्ण, यादव वीर, यदुवंशी असे शब्द वापरून शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांचावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. शिवपाल यादव यांनी येथील जनतेला उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी वरील शब्दांचा चपखल पद्धतीने वापर करून अखिलेश यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. “कंसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांविरोधात आपल्याला एकजूट व्हावे लागेल. कंसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी विश्वासघात करून आपल्या वडिलांनाच सिंहासनावरून बाजूला केले,” असे म्हणत शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

हेही वाचा >>> “केंद्राला भ्रष्टाचाराची नव्हे तर केजरीवाल यांची चिंता”, CBIच्या धाडीनंतर मनीष सिसोदियांची आगपाखड!

“जेव्हा कंसाने त्यांच्या वडिलांना विश्वासघाताने सिंहासनापासून दूर केले तेव्हा धर्माला वाचवण्यासाठी यादवांचा पुत्र कृष्णाने जन्म घेतला. धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी त्याने जन्म घेतला. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी धर्माचा झेंडा घेऊन निघालो आहे. सर्व यादव वीरांना माझे आवाहन आहे की, त्यांनी माझ्यासोबत यावे,” असे शिवपाल यादव आपल्या खुल्या पत्रात म्हणाले आहेत. शिवपाल यांनी अप्रत्यक्षरित्या अखिलेश यादव यांना कंसाची उपमा दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांचे कोठेही घेतलेले नाही.

हेही वाचा >>> VIDEO : हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; ९० वर्ष जूना रेल्वे पूल पत्त्यासारखा कोसळला

अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यात वैर का निर्माण झाले.

शिवपा यादव हे अखिलेश यादव यांच्या वडिलांचे म्हणजेच मुलायमसिंह यादव यांचे छोटे बंधू आहेत. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव हे काका-पुतणे आहेत. या काका-पुतण्यांमध्ये उत्तर प्रदेशात २०१६ साली सरकार स्थापनेवेळी वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. शिवपाल यादव यांनी २०१८ साली प्रगतीशील समाजादी पार्टी (लोहियावादी) या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढे २०२२ साली उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखिलेश यादव आणि शिवपाल यादव पुन्हा एका मंचावर आले. शिवपाल यांनी जसवंतनगर येथून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ही निवडणूक शिवपाल यांनी जिंकली. मात्र या निवडणुकीनंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.

हेही वाचा >>> “कितने आदमी थे? ६५ में से ५० गए और…”, देवेंद्र फडणवीसांची भाजपा मेळाव्यात तुफान टोलेबाजी!

काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली. शिवपाल यांनी एनडीएच्या उमेदवार तथा विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मत दिले. तर समाजवादी पक्षाने विरोधी आघाडीचे उमेदार यशवंत सिन्हा यांना मतदान केले. यानंत शिवपाल यांनी भाजपासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले होते. तर अखिलेश यादव सध्या भाजपा विरोधक आहेत.