मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत आता लोकसभेत निवडून आले आहेत. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या वसंतरावांचे नावही विराजमान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील काही राजकीय घराणी राजकीयदृष्ट्या बाद झाल्याचे दिसत असताना ज्या घराण्यांचा दबदबा अद्यापही कायम आहे, अशा नायगावच्या अमृतराव चव्हाण यांच्या मोठ्या घराण्यातील वसंतराव हे एक प्रतिनिधी. त्यांचे वडील बळवंतराव जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ कृतिशील राहिले. आमदारकीचा त्यांचा वारसा वसंतरावांनी पुढे चालविला. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे यंदा ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर अचानक लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या प्रयत्नातच ते यशस्वी ठरले.

charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
sam pitroda
सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड; वादग्रस्त विधानानंतर दिला होता राजीनामा
om birla loksabha speaker
बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?
Trinamool Congress vs Congress Lok Sabha Speaker
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”
next Chief Minister of the state belongs to the Congress says Vishwajit Kadam
राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच – विश्वजित कदम
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

हेही वाचा…नरेश म्हस्के(ठाणे, शिवसेना शिंदे गट)

जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध केले. नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले. वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.