what it bjp mega plan for loksabha election 2024 ssa 97 | Loksatta

मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती

Loksabha Election 2022 : देशात २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संघटनेत मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती
जे पी नड्डा ( संग्रहित छायाचित्र )

देशात २०२४ साली लोकसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वाधिक कार्यकर्ते असल्याचा दावा करणारा पक्ष भाजपा तयारीला लागला आहे. येत्या निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच भाजपा आपल्या पक्षाचा विस्तार करणार आहे. त्यासाठी भाजपा संघटना पातळीवर कार्यकर्त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ आणखी एक वर्ष वाढवण्यात येईल. जे. पी. नड्डा संघटना पातळीवर आणखी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते पक्षाची आणि सरकारची बाजू भक्कमपणे प्रसारमाध्यमांत आणि जनतेसमोर मांडतील.

हेही वाचा – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद ?

पंतप्रधान, गृहमंत्री, अध्यक्षांवर ‘या’ जबाबदाऱ्या

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपात वरिष्ठ नेत्यांनी आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विकासा’च्या अजेंड्यावर ठाम राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रवादावर आपले विचार मांडतील. तर, जे. पी. नड्डा पक्षवाढीसह सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यांचे दौरे करतील. अलिकडे अमित शाह यांचे सीमावर्ती राज्यांतील वाढलेले दौरे आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर घातलेली बंदी हा या योजनेचा एक भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा – शाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न

‘लोकसभा प्रवास योजना’

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने चारशेहून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी ‘लोकसभा प्रवास योजना’ सुरू केली असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गंत ज्या मतदासंघात २०१९ साली पक्षाने चांगले प्रदर्शन केले नाही, अशा १४४ जागांची निवड केली आहे. याठिकाणी ४० केंद्रीय मंत्र्यांनी मध्यंंतरी दौरे केले आहेत.

हेही वाचा – पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’

पक्षाच्या एका नेत्यांने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की, “भाजपाने संघटनात्मक पातळीवर अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. दुसरीकडे, बूथ पासून राज्यस्तरापर्यंत संघटनापातळीवर लक्ष ठेवण्यासाठी कुशल नेत्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर नवे नेते तयार करावे लागतील. ‘लोकसभा प्रवास योजना’ त्याचाच एक भाग आहे.”

हेही वाचा – बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का?

सत्तेत राहण्यासाठी ‘हा’ उपाय

संघटनेच्या संभाव्य विस्ताराबाबात एका भाजपा नेत्याला विचारले असता ते म्हणाले, “केवळ मजबूत संघटनाच भाजपाला सत्तेत ठेवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे पक्षात अधिकाधिक कार्यकर्त्यांचा प्रवेश करणे, हाच त्यासाठी उपाय आहे. अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत अलिकडे झालेल्या बैठकीत संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आदेश दिले होते.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार?

संबंधित बातम्या

श्रीकांत भारतीय : अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार
भाजपच्या मराठा राजकारणातून विनायक मेटे वजा?
सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या वाणीतून काँग्रेसची खंत !
Gujarat Election: मंदिर, दर्गा आणि आक्रमणकर्ते; पावागडमधील मंदिराचा मुद्दा भाजपासाठी महत्वाचा का आहे?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा