राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले निर्देश जारी केले आहेत. तसेच रश्मी शुक्लांनंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी प्रत्यक्ष मतदानाला अवघे १५ दिवस बाकी असताना आयोगाने ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

१९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या गेल्या काही वर्षांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखपदही सांभाळलं आहे. हे पद सहसा राजकीय नेत्यांच्या अगदी जवळच्या अधिकाऱ्यांना मिळतं, असं म्हटलं जातं.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा – Amravati Vidhan Sabha Election 2024 : भाजपसमोर मतांची टक्‍केवारी वाढविण्‍याचे आव्‍हान

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्यात रश्मी शुक्ला यांचाही समावेश होता. त्यांना राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदारून दूर करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलवण्यात आलं. यादरम्यान त्यांनी आधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून तर नंतर सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून काम केलं.

विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांना महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलवण्यात आलं, त्यावेळी त्यांच्या विरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी सीआयडीच्या प्रमुखपदी असताना नाना पटोले, संजय राऊत एकनाथ खडसे, यांच्या सारख्या विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याविरोधात रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधातील दोन गुन्हे रद्द केले होते, तर एक प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचा राज्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

हेही वाचा – Manoj Jarange Patil in Assembly Election: मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप

याच काळात राज्यात परत महायुतीचे सरकार स्थापन झालं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आलं. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोडही उठवली होती. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकर जाहीर झाली. त्यामुळे फोन टॅपिंक प्रकरणाचा हवाला देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेट घेत रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. अखेर आज निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय घेत त्यांच्या बदलीचे निर्देश दिले.

कोण आहेत रश्मी शुक्ला?

रश्मी शुक्ला यांचा जन्म १५ ऑगस्ट १९६५ साली मुंबईत झाला होता. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूल येथून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसेच एल्फिंस्टन कॉलेजमधून पदवीचे तर मुंबई विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. १९८८ मध्ये त्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा पास होत आयपीएस अधिकारी बनल्या होत्या.

Story img Loader