scorecardresearch

७० वाहने, ३ बंदूका अन् शनि शिंगणापूरला १ कोटी रुपयांचं दान; गोळीबारात मृत्यू झालेले नाबा किशोर दास कोण होते?

ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

who was naba kishor das, naba kishor das donate one core to Shani Shingnapur
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र, नाबा किशोर दास नेमके कोण होते? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – “आरबीआय आणि सेबीने अदानींवरील आरोपांची चौकशी करावी”, ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर काँग्रेसची मागणी; म्हणाले, “पंतप्रधान…”

नाबा किशोर दास हे महाविद्यालयीन काळापासूनच राजकारणात सक्रीय होते. ते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विश्वासू आणि अगदी जवळचे मानल्या जायचे. संबलपूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी आणि कायद्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. दास यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. २००४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर झारसुगुडा येथून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना बीजेडीच्या किशोर मोहंती यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत दास यांना केवळ ५० हजार १३६ मतं मिळाली होती.

हेही वाचा – “अमित शाहांनी जम्मू ते काश्मीर…”, राहुल गांधींचं श्रीनगरमधून आव्हान

नाबा दास हे काँग्रेसमध्ये असताना ते तीनवेळा पश्चिम ओदिशाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले. यावेळी त्यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने पश्चिम ओदिशातील संबलपूर, सुंदरगढ आणि झारसुगुडा येथे काँग्रेस पक्ष मजबूत केला. त्यानंतर २००९ साली पुन्हा ते झारसुगुडामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले. यावेळी त्यांचा विजय झाला. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बीजेडीमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा – समाजवादी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित, अखिलेश यादवांनी काका शिवपाल यादव यांना दिली मोठी जबाबदारी

नाबा दास हे नवीन पटनायक यांच्या मंत्रीमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या आकडेवारी नुसार त्यांच्याकडे एकूण ३४ कोटी रुपयांची संपत्ती होती. तसेच त्यांच्याकडे ७० वाहने, रिव्हॉल्व्हर, डबल बॅरल बंदूक आणि रायफल असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यांना बंदूक आणि रायफल विषयी प्रंचड प्रेम होतं. याबाबत त्यांना विचारलं असता, मी शस्त्र सुरक्षेसाठी नाही, तर फॅशनसाठी बाळगत असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा – “एकवेळ मरण पत्करू, पण भाजपासोबत जाणार नाही…”, नितीश कुमारांचा भाजपावर हल्लाबोल

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात त्यांनी अहमदनगरमधील शनी शिंगणापूर येथील मंदिरात एक कोटी रुपयांचे दान केले होते. त्यानंतर ओदिशात विरोधकांनी त्यांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्याची किंमत १० लाख असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:48 IST