गुजरात निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. येथे भाजपाने १५६ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसची दाणादाण उडाली आहे. काँग्रेसला जागा घटल्या असून, १७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाली आहेत. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने अपेक्षित कामगिरी केली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने भाजपाची सत्ता खालसा केली आहे.

हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या केवळ २५ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसचे ४० जागांवर विजय प्राप्त केला आहे. या विजयानंतर काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नये म्हणून चंदीगडमध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू केली आहे.

odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
Jabalpur stage collapsed
VIDEO : मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, पोलिसांसह चारजण जखमी!
arunachal cm among 10 BJP candidates elected unopposed in assembly election
अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध

हिमाचल प्रदेशात प्रचार करताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली होती. “काँग्रेसमध्ये आठजण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.” त्याला प्रत्युत्तर देताना धर्माशाळेचे माजी आमदार सुधीर शर्मा यांनी म्हटलेलं की, “काँग्रेस हा लोकशाही पक्ष असून, तिथे कोणीही मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू शकतो. ते आठजणांबाबत बोलत आहे. पण, आणखीही उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असू शकतात.”

हेही वाचा : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं?

हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन होणार. त्यामुळे काँग्रेसमध्ये तीन नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी नावे आघाडीवर आहेत. त्यामध्ये सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंग यांची नावे चर्चेत आहेत. प्रतिभा सिंग हे विद्यमान खासदार असून, सुखू, अग्निहोत्री हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सुखविंदर सिंग सुखू

सुखू हे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असून, नादौना मतदारसंघातून ते निवडणूक विजयी झाले आहेत. तीन वेळा आमदार राहिलेले सुखू हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. पण, “मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल,” असे सुखू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं.

मुकेश अग्निहोत्री

मुकेश अग्निहोत्री हे हिमाचलचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी दक्षिण-पश्चिम हिमाचल येथील हरोलीतून निवडणूक लढवली आहे. चारवेळा आमदार राहिलेले मुकेश अग्निहोत्री हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

हेही वाचा : मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी

प्रतिभा सिंह

प्रतिभा सिंह या हिमाचल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. सिंह ह्या पहिल्यांदा २००४ साली मंडी येथून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी महेश्वर सिंह यांचा पराभव केला होता. २०१३ च्या पोटनिवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा प्रतिभा सिंह यांनी पराभव केला होता. त्यामुळे प्रतिभा सिंह यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.