मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांच्या नवी दिल्ली भेटीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या व त्याची छायाचित्र प्रसिद्धीस दिली. पण एक छायाचित्र त्यांनी प्रसिद्धीस का दिले नाही, याची चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाल्यावर अजित पवारांनी दिल्ली गाठली. तशाही अजित पवारांच्या दिल्ली भेटी अलीकडे वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यातील त्यांची दिल्ली भेट अशीच वादग्रस्त ठरली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे बोलले गेले. अर्थात, अजित पवारांनी त्यांची नंतर खुलासाही केला होता. लागोपाठ दुसऱ्या आठवड्यात अजित पवारांनी दिल्लीचा दौरा केला. या भेटीत त्यांनी उपराष्ट्रपती जददिप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेऊन त्याची छायाचित्रे ‘एक्स’ या समाज माध्यमावर प्रसिद्धीस दिली. याबरोबरोबरच त्यांनी दिल्लीत आणखी एक महत्त्वाची भेट घेतली. पण त्याची फारशी वाच्यत केली नाही.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

हेही वाचा >>>वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट; भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई

ही भेट म्हणजे आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली भेट. अजित पवार, खासदार सूनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या भेटीची छायाचित्रे अजित पवारांनी प्रसिद्धीस देण्याचे किंवा ‘एक्स’ या समाज माध्यमावर प्रसिद्धीस देण्याचे टाळले. आता त्याचे कारण काय हे अजित पवारांनाच माहित. अजित पवारांनी ‘एक्स’ वरून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण त्याबरोबर काकांचे जुने छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

मोदी, शहा किंवा धनखड यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या अजित पवारांनी आपले काका व राजकारणातील गुरू शरद पवार यांचेच नेमके छायाचित्र प्रसिद्धीस देण्याचे टाळले. आता हे नजरचुकीने झाले की जाणीवपू्र्वक याचा खुलासा होणे कठीण आहे. पण आपण शरद पवारांच्या पुन्हा जवळ जात आहोत हे चित्र पुन्हा निर्माण होऊ नये वा भाजप नेत्यांची तशी धारणा होऊ नये या उद्देशानेच अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीला फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही.

हेही वाचा >>>लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तालीम अंतिम टप्प्यात

लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारात काका-पुतण्यात कमालीची कटुता निर्माण झाली होती. त्यातच पत्नी सूनेत्रा यांचा बारामती सुप्रिया सुळे यांनी केलेला पराभव अजितदादांना फारच जिव्हारी लागला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचारातही काका-पुतण्याने परस्परांवर हल्ले चढविले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी काकांपासून थोडे दूर राहणेच पसंत केलेले दिसते. भाजप नेत्यांच्या आशीर्वादामुळेच अजित पवारांच्या पत्नी सूनेत्रा पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून येऊनही त्यांना शरद पवारांच्या बंगल्याजवळ दिल्लीत घर मिळाले आहे. वास्तविक ११, जनपथ या बंगल्याचे मंत्री वा ज्येष्ठ सदस्यांना वाटप केले जाते.

Story img Loader