पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, कसब्यामध्ये बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार आहे. कसब्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांना रोखण्याचे आव्हानही भाजपपुढे असणार आहे. चिंचवडमध्ये मात्र जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यास या ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा- राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, प्रवक्त्या दीपिका पुष्कर नाथ यांची ‘या’ कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. २७ फेब्रुवारीला या निवडणुका होणार आहेत.

कसबा मतदारसंघात दिवंगत आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे हे प्रबळ दावेदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वरदा बापट वगळता तिघे उमेदवारीसाठी इच्छुक होते. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारीबाबत अद्याप पक्षामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही’

हेही वाचा- “लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस बाकी, त्यामुळे मुस्लीम समाजापर्यंत…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली असताना, काँग्रेसने ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘राज्यात यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यात येणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.’ गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा सुमारे २८ हजार मतांनी पराभव झाला होता. आता शिंदे हे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष आहेत. ते पुन्हा निवडणूक लढविणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे– पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास कसब्यातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांची कानउघाडणी करत या मतदारसंघात निवडणूक न लढविता अशा प्रसंगी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेसकडून उमेदवार दिला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीतील पक्ष म्हणून निवडणूक प्रचारात उतरावे लागणार आहे.

हेही वाचा- त्रिपूरा, मेघालय व नागालँड या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता टिकविण्याचे भाजपा आाघाडीपुढे आव्हान

चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली गेल्यास या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. कलाटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत.