केरळचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्ल्ख करून राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला असला तरी स्वत:ची आक्रमक हिंदुत्ववादी अशी प्रतिमा उंचाविण्यासाठी राणे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना भाजपमधून प्रतिसाद मिळण्याााबाबत साशंकता व्यक्त केली जाते. उलट भाजपसाठी राणे हे डोकेदुखी ठरण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणे यांनी त्यांची प्रतीमा आक्रमक हिंदुत्ववादी अशी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. रामगिरी महाजारांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून प्रतिक्रिया उमटल्यावर नितेश राणे यांनी रामगिरी महाजारांना काही इजा झाल्यास मशिदीत घुसून मारण्याचा इशारा दिला होता. यावरून राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. राणे यांनी हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केला आहे.

अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Yogi Adityanath First Reaction
Stampede in Kumbh Mela : योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर; म्हणाले,”चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा बळी जाणं…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

हे ही वाचा… जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीने जळगावमध्ये ठाकरे गटाची अवस्था गलितगात्र

केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान करतानाच राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दहशतवादी संघटनांच्या मदतीने लोकसभेत निवडून आल्याचे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले. या वक्तव्यावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी नितेश राणे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केला आहे. तर केरळमधील डाव्या पक्षाच्या खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनीही राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्री नितेश राणे यांची भूमिका मान्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

केरळात भाजपला अद्यापही विस्तार करता आलेला नाही. लोकसभेत त्रिशूऱ् मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. हा अपवाद वगळता भाजपला अजूनही जनाधार मिळू शकलेला नाही. मध्यंतरी ख्रिश्चन समाजाला ज‌वळ करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला. नितेश राणे यांच्या वक्तव्याने केरळमध्ये भाजपचे उलट नुकसानच होईल, अशी स्थानिक भाजप नेत्यांची भूमिका आहे.

हे ही वाचा… जळगाव जिल्ह्यातील मविआ नेते राजकीय विजनवासात

शिवसेना, काँग्रेस असा राजकीय प्रवास करून केवळ ईडीच्या भीतीने नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राणे यांचे पुत्र आता आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडत असले तरी भाजपचे वरिष्ठ नेते नितेश राणे यांना फार काही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही. कोकणात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्वाला शह देण्यात भाजपला राणे यांचा उपयोग झाला. राणे यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

Story img Loader