Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार आहे तर निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारीला लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक सलग जिंकली आहे. आता अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष पुन्हा बाजी मारणार की काँग्रेसची सत्ता येणार? की या दोघांच्या भांडणात भाजपाचा लाभ होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो आहे तो अरविंद केजरीवाल उभ्या असलेल्या नवी दिल्लीच्या जागेचा. शीशमहलचा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अडचणींचा ठरणार का? अशी चर्चा का रंगली आहे आपण समजून घेऊ.

आम आदमी पक्षाचं दिल्लीत वाढलं तेव्हापासून ही निवडणूक कठीण

आम आदमी पक्षाचं महत्त्व दिल्लीत वाढलं तेव्हापासूनच अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उभे राहतात. या मतदारसंघातून ते तीनवेळा आमदार झाले आहेत. मात्र यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात या जागेवरुन दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं उभी आहेत. कांग्रेसने दिल्लीच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना तिकिट दिलं आहे तर भाजपाने साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा यांना तिकिट दिलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासमोर तगडं आव्हान यंदा असणार आहे यात शंकाच नाही.

Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

दिल्लीत १० वर्षांपासून आपची सत्ता

दिल्लीत मागील दहा वर्षांपासून आप म्हणजेच आम आदमी पार्टीची सत्ता आहे. या सत्तेचं केंद्रस्थान माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहिले आहेत. मात्र सध्या दिल्लीत आम आदमी पक्षाबाबत नाराजी आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा आप हा पक्ष उदयास आल्यापासूनची ही सर्वात कठीण निवडणूक आहे अशी चर्चा आहे. वीज, पाणी यांची जास्त देयकं, रोजगार निर्मितीतलं अपयश, पायाभूत सुविधांचा ऱ्हास या सगळ्या मुद्द्यांमुळे दिल्लीकर आपवर नाराज आहेत. आपवर असलेला संताप हा मतपेटीतून व्यक्त होईल अशी चर्चा आहे.

शीशमहलचा मुद्दा चर्चेत, दिल्लीत पोस्टर वॉर

नवी दिल्ली म्हणजेच ज्या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल उभे आहेत आणि त्यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजपाचं कडवं आव्हान आहे त्या मतदारसंघात १ लाखांहून अधिक मतदार आहेत. या ठिकाणी ७ लोककल्याण मार्ग, केंद्रीय मंत्रालयं, राष्ट्रपती भुवन, केंद्रात काम करणारे वरिष्ठ अधिकारी, यांसह दिल्लीतील उच्चभ्रू लोक राहतात. तसंच एक मोठी झोपडपट्टीही या मतदारसंघात आहे. मतदारांचं वर्णन करायचं झाल्यास तो संमिश्र आहे. या सगळ्या वातावरणात भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहलचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच दिल्लीत भाजपाने आपचा उल्लेख आपदा आणि आपत्ती असा करत पोस्टरबाजी केली आहे. शीशमहल म्हणजे वायफळ खर्च असल्याचंही या पोस्टरमधून दाखवण्यात आलं आहे. या मुद्द्यांचा किती परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं

अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या इतर नेत्यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. दरम्यान या बाबत शशी कुमारी या महिलेने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की अरविंद केजरीवाल यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे मुद्दे उपस्थित केले गेले होते. अरविंद केजरीवाल गरीबांसाठी काम करतात, महिलांना मोफत बस प्रवास आणि वैद्यकीय सेवा पुरवतात. शशी कुमारी महिलांच्या एका गटासह बसत हेदेखील सांगतात की भाजपाची सत्ता दिल्लीत आली तर अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या योजना ते बंद करतील. आम्हाला आमचे लाभ मिळायचे असतील तर केजरीवाल मुख्यमंत्री असणं आवश्यक आहे.

लोकांनी काय म्हटलंं आहे?

राजेंद्र कुमार हे एनडीएमसीचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितलं भ्रष्टाचार या मुद्द्याचा विचार सोडला तरीही त्यांच्या मद्य धोरणामुळे त्यांच्या कारभारावर प्रश्न निर्माण केले आहेत. एकंदरीतच केजरीवाल यांच्या विरोधात आणि काही बाजूने अशी मतमतांरं या मतदार संघात पाहण्यास मिळत आहेत. भाजपाने शीशमहलचा मुद्दा उपस्थित केला आहे तर काँग्रेसने केजरीवाल यांना देशद्रोही म्हणत प्रचार सुरु केला आहे. या सगळ्याचा परिणाम कसा होतो? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल.

Story img Loader