संतोष प्रधान

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आल्यावर गेले चार दिवस उद्धव ठाकरे हे जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळेच ठाकरे यांना सामान्य मतदार तसेच शिवसेनेच्या मतदारांची कितपत सहानुभूती आहे याचा अंदाज भाजप आणि शिंदे गटाकडून घेतला जात आहे.

Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह काढून घेतल्यापासून म्हणजेच शुक्रवारी रात्रीपासून उद्धव ठाकरे हे सातत्याने जनतेसमोर येत आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रीय यंत्रणांकडून कशी पायमल्ली सुरू आहे याचा पाढा सातत वाचत आहेत. शिवसेना आणि ठाकरे हे गेल्या जवळपास साडेपाच दशकांचे समीकरण होते. ठाकरेविना शिवसेना हे प्रथमच घडत आहे. भाजपकडून कसा अन्याय करण्यात येत आहे हे दाखविण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात वातावरणनिर्मिती करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. यातूनच ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेते निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या विरोधात कसा अन्याय झाला हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठाकरे यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने जनतेमध्ये त्याची काय प्रतिक्रिया आहे याचा अंदाज भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू झाला आहे.

हेही वाचा… निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपाच्या मोठ्या नेत्याचा पाठिंबा!

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जनतेत काय प्रतिक्रिया उमटली आहे याचे भाजपकडून सर्वेक्षण केले जात आहे. उद्धव ठाकरे यांना किती सहानुभूती मिळते याचा अंदाज घेऊनच पुढील रणतीनी आखली जाईल. शिवसेनेतील अंतर्गत वादात ठाकरे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या समर्थक मंत्री वा आमदारांनी पत्त्युत्तर द्यावे, अशी भाजपची योजना आहे. भाजपने या वादापासून पद्धतशीरपणे दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.