कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजप वा पक्षाशी संबंधित शिक्षक संघटनेचा बालेकिल्ला. पण गेल्या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक संघटनेत झालेल्या फाटाफुटीचा लाभ उठवित शेकापचे बाळाराम पाटील विजयी झाले होते. यंदा भाजपला एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार आयात करण्याची वेळ आली. यामुळेच या मतदारसंघात भाजप पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करणार की शेकाप हा मतदारसंघ कायम राखणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- विश्वजीत कदमांचा अपवाद वगळता सर्वच पोटनिवडणुकांमध्ये लढती

rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक
Chandrapur, new voters,
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक
Tamilisai Soundararajan
मोले घातले लढाया : राजभवनातून उन्हातान्हात..
Ranjeetsingh Naik Nimbalkar On Bjp Candidate Ram Satpute
राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी; रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “एका विमानाने…”

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग असे पाच जिल्हे मिळून हा मतदारसंघाची रचना आहे. विस्तृत प्रदेश असल्याने मतदारांशी संवाद साधणे, संपर्कात राहणे मोठे जिकरीचे काम ठरत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या पाठबळावर राजकीय पक्षांना आपली वाटचाल करावी लागत आहे. या मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, धनाजी नानासाहेब पाटील जनता दल युनायटेड, उस्मान इब्राहीम रोहेकर अपक्ष, तुषार वसंतराव भालेराव अपक्ष, रमेश नामदेव देवरुखकर अपक्ष, बाळाराम दत्तात्रय पाटील अपक्ष आणि रंतोष मोतीराम डामसे अपक्ष असे एकूम आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

हेही वाचा- सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

मतदारसंघात एकूण ३७ हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १४ हजार ९९५, रायगड मधील १० हजार ०८७, पालघर मधील ६ हजार ७१८, रत्नागिरी मधील ४ हजार ०६९ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २ हजार १६४ मतदारांचा समावेश आहे. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेकापने रायगड मधील तर भाजपने ठाणे जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.

हेही वाचा- वंचित व शिवसेना युतीमुळे पश्चिम वऱ्हाडात राजकीय समीकरणे बदलणार

बाळराम पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीची साथ, तसेच रयत शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, पिएनपी एज्यूकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटीची साथ महत्वाची ठरणार आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पाठबळ महत्वपुर्ण ठरणार आहे. शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांनी निवडणूकीतून घेतलेली माघार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पथ्यावर पडू शकते. त्याचबरोबर शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षात मतदारसंघ बांधणी म्हात्रे यांना उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे दोन तुल्यबळ प्रमुख उमेदवारांत मतदारसंघासाठी लढत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा-

काही अपवाद वगळले तर या मतदान संघावर कायम भाजप प्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहीला आहे. सुरवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते.. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थान खालसा केले होते. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे शेकापने खालसा केलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान भाजप समोर असणार आहे.