सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ अशी ओळख असणाऱ्या शिक्षक मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार विक्रम काळे व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अर्थात भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यामध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ६१ हजार ५२९ मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. मराठवाडा शिक्षक संघ आणि अन्यही काही शिक्षक संघटनांचे उमेदवार निवडणुकीमध्ये रिंगणात उभे राहण्याची तयारी करत आहेत.

raver lok sabha marathi news, ravel lok sabha ncp candidate marathi news
भाजपमधून प्रवेश केलेल्या श्रीराम पवार यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी
Sunetra Pawar
बारामतीसाठी उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या “जनतेने…”
lok sabha elections 2024 bjp udayanraje bhosale confirmed from satara lok sabha constituency
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक? भाजप-राष्ट्रवादीत अलिखित करार, शिवसेनेत अस्वस्थता
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

करोनाकाळात शिक्षकांचे वेतन न कापता देता यावे यासाठी पाठपुरावा करत कायम विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेमध्ये काम करता आले. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्री अजित पवार असल्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी काम करता आल्याची भावना आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केली. दरम्यान भाजपचे उमेदवार म्हणून किरण पाटील यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. लातूर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यात शिक्षक मतदारांची संख्या अधिक असल्याने औरंगाबाद येथील किरण पाटील यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. पण शिक्षकांचे प्रश्न हाती घेऊन भाजपने लढा उभा केला असल्याचे चित्र दिसून आले नाही. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी, शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलतात. शाळेच्या गुणवत्तेवर त्याचा कमालीचा परिणाम असल्याचे मुद्दे उपस्थित केल्यानंतर शिक्षक आमदारांनी मोर्चाही काढला होता. मात्र, आमदार बंब यांची या प्रकरणातील भूमिका वैयक्तिक असल्याची भूमिका नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घ्यावी लागली होती. ‘ फ्रेंडस् ऑफ बीजेपी’ या कार्यक्रमास औरंगाबाद येथे ते आले होते तेव्हा त्यांनी शिक्षक मतदारसंघाच्या रणनीतीवर चर्चा केली होती. या मतदारसंघात औरंगाबाद व लातूर या दोन जिल्ह्यातील मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचे अशी भाजपची रणनीती असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षक परिषदेतील कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते किरण पाटील यांचा मिळून प्रचार करतील असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी ?

सलग तीन वेळा मतदारसंघात विजयी ठरलेले आमदार विक्रम काळे यांचा संपर्क दांडगा असून व्यक्तिगत संपर्कापासून ते राष्ट्रवादीतील संस्थात्मक राजकारणाचा त्यांना लाभ होईल असे मानले जात आहे. सलग तीन वेळा विजयी ठरलेल्या काळे यांच्या कार्यशैलीवर भाजपने अजून एकही आरोप केलेला नाही. शिक्षक मतदारसंघात शिक्षक संघटनांचाही मोठा प्रभाव अनेक वर्षे होता. आमदार म्हणून शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी केलेली कामगिरी लक्षात राहणारी होती, असा दावा शिक्षक संघटनांचे उमेदवार करतात.

हेही वाचा… देवेंद्र भुयार : शेतकरी आंदोलक ते आमदार

शिक्षक मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात आता मंत्री करावे अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, तेव्हा त्यांच्या मागण्यांना अजित पवार यांनी वेसण घातली होती. स्व. वसंतराव काळे यांच्या कार्यकौशल्यामुळे बांधलेला हा मतदारसंघ विक्रम काळे यांनी आपल्या संपर्कामुळे पुढे अधिक मजबूत केला. या मतदारसंघात ६१५२९ मतदार आहेत. त्यात ४६ हजार ७८० पुरुष, तर १४ हजार ७४९ महिला मतदार आहेत. आता शिक्षण क्षेत्रातील परिमाण बदलत असल्याने ही निवडणूक दुरंगी होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. गेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत २० उमेदवार रिंगणात उभे होते.