scorecardresearch

राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबाव

शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या जाहिरात फलकांवर मुख्यमंत्र्यांचेच चित्र झळकले पाहिजे यासाठी मंत्रालयातून सुत्रे हलवण्यात आली. त्यासाठी फलकांसाठी केलेली पूर्व नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबाव
राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबाव

चंद्रशेखर बोबडे

नागपूर: विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे शहर विद्रुप झाले आहेत. नजर टाकावी तेथे फलक दिसून येते. यात काही अधिकृत आहेत तर अनेक अनधिकृत आहेत. अधिवेशन जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात होत असले तरी फलकांवर मात्र ए कनाथ शिंदे व त्यांच्याच गटाची छाप दिसून येते.
दरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या जाहिरात फलकांवर मुख्यमंत्र्यांचेच चित्र झळकले पाहिजे यासाठी मंत्रालयातून सुत्रे हलवण्यात आली. त्यासाठी फलकांसाठी केलेली पूर्व नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

प्रत्येक शहर स्वच्छ-सुंदर राहावे यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत योजना सुरू केली. महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. नागरिकांनाही शहर सौंदर्यीकरणाचे महत्व महापालिकेकडून सांगितले जाते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर येते. मात्र सध्या जे विद्रुपीकरण झाले आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे फलक लावताना नियम पायदळी तुडवतात तर ज्या नेत्यांचे फलक लावले आहे तो सत्ताधारी पक्षाचा असल्याने अ धिकारी कारवाई करण्यास धजत नाही, त्यामुळे सध्या तरी संपूर्ण शहराला सध्या तरी चित्र-विचित्र रुप आले आहे,याबाबत नागपूरकर संताप व्यक्त करीत आहे. विशे्ष म्हणजे अनधिकृत फलक लावण्यास मनाई आहे.

हेही वाचा: शिवसेना-वंचित युती : परिवर्तनाची नांदी

याबाबत उच्च न्यायालयाने अनेकदा नागपूर महापालिकेला याबाबत फटकारले आहे. तरीही संपूर्ण शहरात अनधिकृतपणे राजकीय फलक लावलेले असतानात कारवाई केली जात नाही. विमानतळापासून तर विधानभवनापर्यंत, विधान भवनापासून तर मंत्र्यांच्या बंगल्यांपर्यतच्या सर्व मार्गांवर, शहरातील सर्व प्रमुख चौक, रस्ते या ठिकाणी सत्ताधारी शिंदे-भाजप नेत्यांचे मोठे कटाऊट्स लावण्यात आले आहेत. लक्ष्मीनगर चौकात भाजप नेत्याचे ३० फुट उंच कटाऊट आहे. चौकातील सिग्नल फलकांनी झाकोळून गेले आहेत.

अमरावती व वर्धा मार्ग, रिझर्व बॅक चौक, सिव्हील लाईन्समध्ये हे चित्र पाहायला मिळते. विमानतळ ते विधानभवन या दरम्यानच्या मार्गावरील सर्व प्रमुख फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र झळकले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात दोनशेवर जाहिरात फलक नोंदणीकृत आहेत. काही जागा स्वत: महापालिकेच्या आहेत. काही खासगी जागा आहेत. हिवाळी अधिवे्शनाच्या निमित्ताने एक महिन्या आधीपासून जाहिरात फलकांसाठी नोंदणी केली जाते. यावेळीही करण्यात आली होती. मात्र अधिवेशनाच्या दोन दिवस आधी प्रमुख ठिकाणच्या फलकांची जुनी नोंदणी रद्द करण्यात आली. त्याठिकाणी शिंदे गटाचे फलक लागले. यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याची सध्या नागपुरात चर्चा आहे.

हेही वाचा: सोलापूरात कारखान्याच्या चिमणीच्या माध्यमातून राजकीय चढाओढ

नागपूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर आहे. त्यांच्या कृपेनेच शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण शहर भगवे करण्याचे ठरवले, त्याची प्रचिती मेट्रोच्या उड्डाण पुलावर लावण्यात आलेले फक्षाचे झेंडे, नेत्यांच्या फलकांवरून येते . मात्र मुख्यमंत्री म्हणून नागपूरला शिंदे प्रथमच येत असल्याने त्यांच्या समर्थकांनी कुठल्याही बाबतीत मागे राहू नये म्हणून फलक स्पर्धेत भाजपवर मात करण्यात प्रयत्न केला. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी असलेल्या जाहिरात फलकांवर शिंदेच झळकत असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 14:31 IST

संबंधित बातम्या