तुकाराम झाडे

भारत जोडो यात्रेमध्ये विविध स्तरातील लोक सहभागी होत असताना सामाजिक विषय घेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्या विषयांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्यासाठी काही मंडळी यात्रेत सहभागी झाले आहेत. सारिका पाखरे ही त्यापैकीच एक. बालविवाहाचा प्रश्न मांडण्यासाठी ती “लेक लाडकी” या संस्थेच्या माध्यमातून ती भारत जोडो यात्रेत सामील झाली आहे.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

हेही वाचा… नांदेडच्या उत्स्फूर्त स्वागतानंतर भारत जोडोचा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश; १५ हजार लातूरकर यात्रेत

“मी लहान असताना आणि मला खूप शिकायची इच्छा असताना, माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. अनेकदा विनवण्या करूनही माझे कोणी ऐकले नाही. तेव्हा मी धाडसाने आणि “लेक लाडकी” संस्थेच्या मदतीने लग्न रोखले. पण माझ्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात आणि देशातही तीच स्थिती आहे. हाच विषयावर मला राहुलजींशी बोलायचा आहे,” असे १७ वर्षीय सारिका पाखरे (मानूर, जिल्हा बीड ) या युवतीने सांगितले. सामाजिक ज्वलंत प्रश्न प्राध्यान्याने हाताळून समाजात जनजागृती करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था ‘भारत जोडो’ यात्रेत जोडल्या गेल्या आहेत. साताऱ्यातील “लेक लाडकी” संस्था ही त्यापैकीच एक. “आमचा भाग दुष्काळी, त्यामुळे ऊसतोड कामगार जास्त. ऊसतोडीला जात असताना सोबत मुलींना घेऊन न जाता त्यांचे कोवळ्या वयात लग्न करून आईबाप रिकामे होतात,” ती व्याकुळ होऊन व्यथा मांडत होती.

हेही वाचा… देश-विदेशातून भारत जोडोसाठी यात्री दाखल

माझ्याप्रमाणेच माझ्या दोन मैत्रिणींचे बालविवाह सुद्धा मी रोखले आहेत. पण हे कायमस्वरूपी रोखून सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योग उभारले जाणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार वाढेल आणि आमच्या कुटुंबांचे स्थलांतर थांबेल. स्थलांतर थांबले की मुलींना घरी सुरक्षितपणे वावरता येईल, शिकता येईल मग बाल विवाह सहजपणे रोखता येतील. ही माझीच नव्हे महाराष्ट्रातील माझ्या सारख्या हजारो लेकींची व्यथा आहे. ती राहुलजींना मी सांगणार आहे…”असे सारिकाने सांगितले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास नांदेडजवळील दाभाड येथून यात्रा सुरू झाली. तेव्हा संस्थेच्या प्रमुख वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्य सारिका सोबत यात्रेत चालत होते. देशाच्या एकतेचा, अखंडतेचा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचा संदेशच्या बॅनरचे जॅकेट घालून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. ते महाराष्ट्रातील यात्रेच्या संपूर्ण टप्प्यात पुढील ९ दिवस चालणार आहेत.