मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आदित्य ठाकरे हे सध्याचे वरळीचेआमदार असले, तरी ते वरळीचे स्थानिक रहिवासी नाहीत. शिंदे गटाकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेनेही संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, देवरा यांच्यासह देशपांडे देखील स्थानिक ‘वरळीकर’ नाहीत.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. आदित्य यांनी देखील या मतदारसंघात मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. आदित्य हे वरळीचे स्थानिक रहिवासी नाहीत. शिंदे गटाकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवरा हे वरळीकर नसून, ते कंबाला हिल (पेडर रोड) परिसरात वास्तव्यास आहेत.

Rashmi Shukla Election Commission appointment government print politics news
रश्मी शुक्ला यांचे भवितव्य नव्या सरकारच्या हाथी
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत उमेदवार उभा केला नव्हता. पण यावेळी मनसेनेही वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्याप्रमाणे देशपांडे हेही स्थानिक वरळीकर नाहीत. ते माहीम येथील रुपारेल महाविद्यालय परिसरातील रहिवासी आहेत.

अन्य पक्षांची स्थानिकांनी पसंती

दुसरीकडे, वरळी मतदारसंघातून बहुजन समाजवादी पक्षाचे सुरेश गौतम, वंचित बहुजन आघाडीचे अमोल निकाळजे यांना, ‘एपीआय’कडून भीमराव सावंत, ‘एआयएम’कडून रिझवान कादरी यांना उमेदवारी दिली असून, हे सर्व वरळीतील रहिवासी आहेत. तसेच, अपक्ष उमेदवार मोहम्मद कादरीही स्थानिक वरळीकर आहेत. याशिवाय, बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले भगवान नागरगोजे हे देखील वरळीतून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, ताडदेव परिसरात राहणारे अमोल रोकडेही हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >>>Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

एकमेव महिला उमेदवाराचीही माघार

वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, बहुजन समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिक सेना, समता पार्टी यांचे उमेदवार रिंगणात आहेत. परंतु एकाही पक्षाने महिलेला उमेदवारी दिलेली नाही. यापूर्वी, वरळीतून साक्षी पाटोळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पण, त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, वरळीत सध्या एकही महिला उमेदवार नाही.

Story img Loader