उमाकांत देशपांडे

मुंबई : मध्यमवर्गीय कुटुंबातील भाजपच्या प्रदेश सचिव असलेल्या दिव्या ढोले या उच्चशिक्षित असून विक्री व पणन (सेल्स अँड मार्केटिंग) मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. बर्फीवाला स्कूलमधून शालेय शिक्षण, डहाणूकर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या ढोले यांनी आयबीएममध्ये १६ वर्षे तर रहेजा कॉर्प, आयएसओ ९००० सिस्टम कन्सल्टन्टमध्ये सल्लागार आणि लेखापरीक्षक म्हणून काम केले.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट

दिव्या ढोले यांनी २००२ मध्ये नोकरी करीत असतानाच राजकारणात सक्रिय होण्यास सुरुवात केली व अल्पावधीतच जम बसविला. मुंबई युवा मोर्चा, मुंबई भाजपच्या सचिव आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर ढोले यांनी २०१४ मध्ये धारावीतून विधानसभेची निवडणूक लढविली होती. शिवसेना-भाजप युती तुटल्यावर अचानकपणे उमेदवारी मिळालेल्या ढोले यांचा निवडणुकीत पराभव झाला. पण या मतदारसंघात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत.

हेही वाचा: शिवसेना फुटीनंतर नाशिकमध्ये उणीधुणी काढण्याची स्पर्धाच लागली

शासकीय योजनांचा लाभ अनेकांना मिळवून देणे, १०० कुंभारांना पॉटरीचे प्रशिक्षण आणि आधुनिक सामग्री दिली. बंद पडलेल्या शाळा सुरू केल्या. रहेजा रुग्णालय व इतरांच्या मदतीने आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली. संकल्पसिद्धी ट्रस्ट २००४ मध्ये स्थापन करून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक भागांत सीसीटीव्ही प्रकल्प, खादी ग्रामोद्योग विभाग आणि विविध शासकीय योजनांचा लाभ शेकडो गरजूंना मिळवून दिला. अंधेरी व धारावीत महिला बचत गटांच्या माध्यमातून काम केले.

हेही वाचा: शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता

ढोले यांनी २०१८ मध्ये सिनेटेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र सांस्कृतिक समिती अंतर्गत फिल्मसिटीमध्ये कलाकारांसाठी रुग्णवाहिका आणि अन्य उपक्रम राबविले. महिला कलाकारांना मदत केली. नोकरी करीत राजकारण करीत असताना ९० टक्के समाजकारण करण्यावरही भर दिल्याचे ढोले यांनी सांगितले. गेल्या वर्षीपासून भाजप प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सांभाळत असताना सशक्त बूथ अभियान, भाजपची कॉल सेंटर यंत्रणा आणि पक्षाची समाजमाध्यमे यंत्रणा यांचेही काम दिव्या ढोले करीत आहेत.