Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP Ajit Pawar Candidate List लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे दोन माजी खासदार, नुकतीच हत्या झालेले बाबा सिद्दिकी व वादग्रस्त नवाब मलिक यांचा मुलगा व मुलगी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सात जणांच्या दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे.

राष्ट्रवादीने पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत सात अशा प्रकारे आतापर्यंत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपचे सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा आक्षेप होता. यामुळेच त्यांची मुलगी सन्ना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नुकतीच हत्या झालेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्र‌वेश केला होता. पण त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

dipesh mhatre and mahesh gaikwad
डोंबिवलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे-महेश गायकवाड यांची भेट; विकास कामे, नागरी समस्यांवर चर्चा केल्याचा दावा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
wardha district bjp mla
भाजपला तर यश मिळाले, आमचे काय ? महासंघाचा सवाल…
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच
Chhagan Bhujbal on Mahayuti
Chhagan Bhujbal : महायुतीत मंत्रि‍पदावरून रस्सीखेच? ‘शिंदेंच्या शिवसेनेएवढी मंत्रि‍पदे आम्हाला द्या’, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी मागणी
nitin gadkari gets back seat next to amit shah in lok sabha
गडकरींचा आसन क्रमांक ५८वरून पुन्हा चारवर
Apoorva hiray, Ajit Pawar meet Apoorva hiray,
अजित पवार गटात अपूर्व हिरे यांचा प्रवेश ?
Raju Patil on EVM and Eknath Shinde.
Raju Patil : “शेवटी भाजपा सांगेल तेच करावे लागणार…” मनसेचा माजी आमदार एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाला? ईव्हीएमवरही उपस्थित केले प्रश्न

हेही वाचा >>>Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”

सांगली जिल्ह्यातील तासगाव मतदारसंघात दिवंगत आ. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य होते. या वेळी राष्ट्रवादीने (शरद पवार) आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र लढण्याच्या तयारीत होते. पण भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्वेक्षणात संजयकाकांच्या मुलाचा निभाव लागणे कठीण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामुळे लोकसभेत पराभूत झालेल्या संजयकाका पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला व त्यांना तासगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. नांदेडमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रताप चिखलीकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली आणि त्यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार) जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे समर्थक निशिकांत पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून वादग्रस्त आमदार सुनील टिंगरे यांना पक्षाने फेरउमेदवारी दिली.

Story img Loader