News Flash

Pro Kabaddi Season 6 : बंगळुरु बुल्सचे सामने पुण्याच्या मैदानात हलवले

आयोजकांची माहिती

Pro Kabaddi Season 6 : बंगळुरु बुल्सचे सामने पुण्याच्या मैदानात हलवले
बंगळुरु बुल्सचा संघ सहाव्या पर्वात खेळताना

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात बंगळुरु बुल्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स यांनी आज यासंदर्भात ही घोषणा केली. 23 ते 29 नोव्हेंबर दरम्यान बंगळुरु बुल्स आपल्या घरच्या मैदानातले सामने खेळणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बंगळुरु बुल्सचे घरच्या मैदानावरील सामने 27 नोव्हेंबर पासून सुरु होणार होते. मात्र नवीन वेळापत्रकानुसार 23 नोव्हेंबर रोजी बंगाल वॉरियर्सविरोधात बंगळुरु बुल्स आपला पहिला सामना खेळतील. याव्यतिरीक्त प्रो-कबड्डीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 8:17 pm

Web Title: bengaluru bulls home leg matches to be held in pune
टॅग : Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सच्या राहुल चौधरीची घौडदौड सुरुच
2 Pro Kabaddi Season 6 : तामिळ थलायवाजपुढे पुणेरी पलटण ठरली निष्रभ
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या विजयात मराठमोळा सिद्धार्थ देसाई चमकला
Just Now!
X