News Flash

Pro Kabaddi Season 6 : जाणून घ्या आतापर्यंतचे सर्वोत्तम 5 चढाईपटू

उत्तर प्रदेशचे श्रीकांत जाधव, यू मुम्बाचा श्रीकांत देसाई चमकले

यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाईचा आक्रमक खेळ

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली असून हळूहळू ही स्पर्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करते आहे. पहिल्या सत्रात चेन्नईमधले सामने पार पडल्यानंतर सध्या सोनिपतमध्ये प्रत्येक संघ मैदानात उतरले आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये काही अनोख्या गोष्टी समोर आलेल्या पहायला मिळाल्या आहेत. अनुभवी खेळाडूंना टक्कर देत, नवोदीत खेळाडूंनीही अव्वल चढाईपटूंच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.

उत्तर प्रदेशचा श्रीकांत जाधव, यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई, हरयाणाचा विकास कंडोला आणि तामिळ थलायवाजचा अतुल एम.एस. यांनी आपल्या धडाकेबाज खेळाने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कोणत्या चढाईपटूने पहिलं स्थान राखलं आहे आपण पाहूयात.

1) अजय ठाकूर – (तामिळ थलायवाज) – 5 सामन्यांत 60 गुण

2) नितीन तोमर – (पुणेरी पलटण) – 4 सामन्यांत 52 गुण

3) प्रदीप नरवाल – (पाटणा पायरेट्स) – 3 सामन्यांत 41 गुण

4) श्रीकांत जाधव – (यूपी योद्धा) – 4 सामन्यांत 36 गुण

5) सिद्धार्थ देसाई – (यू मुम्बा) – 3 सामन्यांत 36 गुण

याव्यतिरीक्त हरयाणाच्या विकास कंडोलाने 29 गुणांसह सातवं तर तामिळ थलायवाजच्या अतुल एम.एस. ने 24 गुणांसह नववं स्थान पटकावलं आहे. अ गटात बिगर अनुभवी खेळाडूंसह खेळणाऱ्या यू मुम्बाने सर्वांना आश्चर्यचकीत करत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर दुसरीकडे ब गटात दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरललेल्या तामिळ थलायवाजला मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. आतापर्यंत तामिळ थलायवाजचा संघ ब गटात गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

(( महत्वाची सूचना – ही आकडेवारी 15 तारखेपर्यंतची आहे ))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:28 pm

Web Title: pro kabaddi 2018 know top 5 raiders in season 6 till now
टॅग : Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : हरयाणाच्या पराभवाची मालिका सुरुच, पुणेरी पलटणने केली मात
2 Pro Kabaddi Season 6 : पाटण्याच्या विजयात प्रदीप नरवाल चमकला, उत्तर प्रदेशवर मात
3 Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीचा अष्टपैलू खेळ, पुणेरी पलटणवर मात
Just Now!
X