30 March 2020

News Flash

अनुप कुमार प्रो-कबड्डीला रामराम करण्याच्या तयारीत?

सहाव्या हंगामात अनुप आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाहीये

पुणेरी पलटण विरुद्ध सामन्यात अनुप कुमार

क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना कबड्डीची नव्याने ओळख करुन देण्यामध्ये अनुप कुमार या खेळाडूचा मोठा वाटा आहे. प्रो-कबड्डीतले पहिले पाच हंगाम यू मुम्बा या संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या अनुप कुमारने देशभरात कबड्डीचे नवीन चाहते निर्माण केले. प्रो-कबड्डीतल्या खेळामुळे अनुपला भारतीय कबड्डी संघाचं नेतृत्वही करायला मिळालं. यंदाच्या हंगामात अनुपला यु मुम्बा संघाने कायम राखलं नाही, ही संधी साधत अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सने अनुपला आपल्या संघात स्थान दिलं. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप कुमार याच हंगामात प्रो-कबड्डीला रामराम करण्याच्या तयारीत आहे.

सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाचे सामने हे जयपूरवरुन हरयाणातील पंचकुला येथे हलवण्यात आले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये अनुप कुमारला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. त्यामुळे घरच्या मैदानावर आपल्या प्रो-कबड्डीतील कारकिर्दीची शेवट करण्याचा विचार अनुप कुमारने केल्याचं समजतं आहे.

पंचकुलाच्या मैदानात जयपूरचा संघ 6 सामने खेळणार आहे. 20 डिसेंबर रोजी जयपूरचा संघ आपला शेवटचा सामना खेळेल. सहाव्या हंगामात जयपूरच्या संघाची बाद फेरीत प्रवेशाची आशा जवळपास संपुष्टात आलेली आहे. पंचकुलातील सामन्यानंतर जयपूर बंगालच्या संघाविरुद्ध एक साखळी सामना खेळणार आहे. या सामन्यात अनुप मैदानात उतरणार नसल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. मात्र प्रो-कबड्डीतील निवृत्तीनंतर अनुप स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत राहणार असल्याचं समजतंय. अनुप कुमारने प्रो कबड्डीत आजपर्यंत ९० सामन्यात ५९३ गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो ६व्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2018 5:46 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 anup kumar is planning to quit pro kabaddi says sources
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : पोस्टरबॉय राहुल चौधरी चमकला, अनोख्या विक्रमाची नोंद
2 Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सची झुंज मोडून काढत बंगळुरु बुल्सची बाजी
3 Pro Kabaddi Season 6 : पिछाडी भरुन काढत पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात
Just Now!
X