27 September 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : बंगाल वॉरियर्सकडून जयपूर पिंक पँथर्सचा धुव्वा

जयपूरचे बचावपटू पुन्हा अपयशी

जयपूर विरुद्ध बंगाल सामन्यातील एक क्षण

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स संघाच्या खराब कामगिरीची मालिका सुरुच राहिलेली आहे. पाटण्यात सुरु असलेल्या सामन्यांमध्ये इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत बंगाल वॉरियर्सने जयपूरचा 39-38 ने धुव्वा उडवला. बंगालच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत विजयामध्ये मोलाचा हातभार लावला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पंचकुलात हलवले

बंगाल वॉरियर्सकडून चढाईमध्ये महेश गौड, मणिंदर सिंह आणि जँग कून ली या त्रिकुटाने अक्षरशः दाणादाण उडवली. जयपूरच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत बंगालने सामन्यात आघाडी घेतली. महेशने सामन्यात 9 तर मणिंदर आणि जँग कून लीने अनुक्रमे 7 व 6 गुणांची कमाई केली. यांना कर्णधार सुरजित सिंह आणि रण सिंह या बचावपटूंनी 5-5 गुण मिळवत भक्कम साथ दिली. बंगालच्या या आक्रमक खेळापुढे जयपूरचा संघ सामन्यात सावरुच शकला नाही.

दुसरीकडे जयपूरच्या दिपक निवास हुडा आणि कर्णधार अनुप कुमारने चांगली झुंज दिली. मात्र बचावफळीतल्या एकाही खेळाडूला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. मोहित छिल्लर, अजिंक्य पवार या खेळाडूंकडून चांगल्या आशा होत्या, मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. या पराभवानंतर अ गटात जयपूरचा संघ सध्या तळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 9:22 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 bengal warriors beat jaipur pink panthers in one sided match
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पंचकुलात हलवले
2 Pro Kabaddi Season 6 : गुजरात फॉर्च्युनजाएंटकडून तामिळ थलायवाजचा धुव्वा
3 Pro Kabaddi Season 6 : पाटणा पायरेट्सचा अष्टपैलू खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत
Just Now!
X