घरच्या मैदानावर खेळत असलेल्या गतविजेत्या पाटणा पायरेट्सच्या खराब कामगिरीचा सिलसिला काही केल्या संपण्याची चिन्ह दिसतं नाहीयेत. सलग चौथ्या सामन्यात पाटणा पायरेट्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या लढाईत बंगळुरु बुल्सने पाटणा पायरेट्सवर ४३-४१ अशी मात करुन सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणला सूर गवसला, दबंग दिल्लीवर मात

दोन्ही संघांनी आज दोन्ही सत्रांमध्ये तोडीस तोड खेळ केला. पाटणा पायरेट्सकडून आजच्या सामन्यात प्रदीप नरवालला आपली छाप पाडता आली नाही. मात्र दीपक नरवाल आणि मनजित या खेळाडूंनी प्रदीपची कमतरता भासू दिली नाही. दोन्ही खेळाडूंनी चढाईत प्रत्येकी १०-१० गुणांची कमाई केली. अष्टपैलू कुलदीप सिंह, विकास काळे, जयदीप या बचावपटूंनीही आपली कामगिरी चोख बजावत संघाचं आव्हान कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

अवश्य वाचा – सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीला अल्प प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती

अखेरच्या मिनीटांपर्यंत दोन्ही संघ हे बरोबरीत सुरु होते. हा सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकतो की काय असं वाटत असतानाच बंगळुरु बुल्सच्या चढाईपटूंनी सामन्यातं पारडं आपल्या दिनेशे पलटवलं. युवा सुमित शेरावत, अनुभवी काशिलींग अडके यांनी चढाईत अनुक्रमे १५ व ११ गुणांची कमाई केली. या दोघांना कर्णधार रोहित कुमारनेही चांगली साथ दिली. बंगळुरुच्या बचावफळीला आज फारशी चमक दाखवता आली नसली, तरीही त्यांचं अर्ध्याहून अधिक काम चढाईपटूंनी पूर्ण केलं होतं. या पराभवानंतर पाटण्याचा संघ ब गटात पाचव्या स्थानावर घसरला आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने मोडला राहुल चौधरीचा विक्रम