X
X

Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सची झुंज मोडून काढत बंगळुरु बुल्सची बाजी

34-26 च्या फरकाने मिळवला विजय

पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळणाऱ्या बंगळुरु बुल्सचे अटीतटीच्या लढाईत तेलगू टायटन्सवर मात केली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळुरु बुल्सने तेलगू टायटन्सची झुंज 34-26 ने मोडून काढली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पिछाडी भरुन काढत पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात

तेलगू टायटन्सने आज निलेश साळुंखेला संघात जागा दिली नाही, त्यामुळे तेलगूच्या चढाईचा भार हा राहुल चौधरीच्या खांद्यावर आला. पहिल्या सत्रात तेलगू टायटन्सने अनपेक्षित खेळ करत बंगळुरु बुल्सवर आघाडी मिळवण्यात यश मिळवलं. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या विशाल भारद्वाजने आज बचावात 6 गुणांची कमाई करत आपलं महत्व सिद्ध केलं. या खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्सने पहिल्या सत्राअखेरीस 15-11 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रातही बंगळुरुने तेलगू टायटन्सला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. मात्र सामना संपण्यासाठी शेवटची 10 मिनीटं शिल्लक असताना बंगळुरुने सामन्याचं पारडं आपल्याकडे फिरवलं. कर्णधार रोहित कुमार, पवन शेरावतने मोक्याच्या क्षणी तेलगू टायटन्सच्या बचावफळीला खिंडार पाडलं. दुसऱ्या सत्रात तेलगू टायटन्सला सर्वबाद करण्यात बंगळुरुला यश आल्याने शेवटच्या क्षणांमध्ये यजमान संघाला निर्णायक आघाडी घेता आली. अखेर 34-26 च्या फरकाने विजय मिळवत बंगळुरुने ब गटात आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

22

  • Tags: bengaluru-bulls, Pro Kabaddi 6, telgu-titans,
  • Just Now!
    X