18 February 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईला बंगळुरुच्या पवन शेरावतची कडवी टक्कर

सिद्धार्थला मागे टाकत पवन सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात तरुण चढाईपटूंनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने मातब्बर खेळाडूंना मागे टाकत गुणांमध्ये बाजी मारली होती. आता बंगळुरु बुल्सच्या पवन शेरावतने सिद्धार्थला मागे टाकत चढाईत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूचा मान पटकावला आहे.

एकूण गुण आणि चढाईतले गुण या दोन्ही निकषांमध्ये पवन आणि सिद्धार्थ यांच्यातलं गुणांचं अंतर अवघ्या काही गुणांचं आहे. मात्र बंगळुरु बुल्स सध्या आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळत असल्यामुळे पवनला आपली आघाडी वाढवण्याची नामी संधी आहे. दरम्यान 26 नोव्हेंबररोजी उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पवनने चढाईत 150 गुणांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा पवन सहाव्या पर्वातला सिद्धार्थनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

सर्वाधिक गुण मिळवणारे खेळा़डू –

पवन कुमार शेरावत – 164 – बंगळुरु बुल्स
सिद्धार्थ देसाई – 156 – यू मुम्बा
प्रदीप नरवाल – 146 – पाटणा पायरेट्स
अजय ठाकूर – 139 – तामिळ थलायवाज
विकास कंडोला – 127 – हरयाणा स्टिलर्स

चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू –

पवन शेरावत – 155 – बंगळुरु बुल्स
सिद्धार्थ देसाई – 153 – यू मुम्बा
प्रदीप नरवाल – 146 – पाटणा पायरेट्स
अजय ठाकूर – 138 – तामिळ थलायवाज
विकास कंडोला – 125 – हरयाणा स्टिलर्स

(तळटीप – ही आकडेवारी 26 नोव्हेंबरपर्यंतच्या सामन्यापर्यंतची आहे)

First Published on November 28, 2018 3:54 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 bengaluru bulls pawan sherawat gives tough fight to u mumba siddarth desai
टॅग Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्सची दबंग दिल्लीवर मात
2 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बा अ गटात पुन्हा अव्वल, दबंग दिल्लीवर केली मात
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर बंगळुरु बुल्स पहिल्याच सामन्यात पराभूत
Just Now!
X