News Flash

Pro Kabaddi Season 6 : दिल्ली ठरली दबंग, बंगाल वॉरियर्स पराभूत

दबंग दिल्लीचा अष्टपैलू खेळ

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात बंगाल वॉरियर्स संघाला आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंटर झोन चॅलेंज स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दबंग दिल्लीने बंगाल वॉरियर्सवर 39-30 ने मात केली. दिल्लीच्या संघाने केलेला अष्टपैलू खेळ हे त्यांच्या विजयामागचं प्रमुख कारण ठरलं.

दबंग दिल्लीने नवोदीत नवीन कुमारला आज चढाईसाठी संघात स्थान दिलं. नवीननेही आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत 11 गुणांची कमाई केली. त्याला चंद्रन रणजितने 7 गुण मिळवून तोलामोलाची साथ दिली. या दोन्ही चढाईपटूंनी बंगालचा बचाव खिळखिळा करुन टाकला. या दोन्ही चढाईपटूंना उजवा कोपरारक्षक रविंदर पेहल आणि डावा कोपरारक्ष जोगिंदर नरवाल यांनी सर्वोत्तम साथ दिली.

दुसरीकडे बंगालच्या संघानेही चांगला खेळ केला. चढाईमध्ये जँग कून ली आणि मणिंदर सिंहने चांगले गुण मिळवले. या दोन्ही खेळाडूंना महेश गौडने चांगली साथ दिली, मात्र बंगालचे बचावपटू मोक्याच्या क्षणी गुण कमावू शकले नाही, ज्याचा फायदा घेत दिल्लीच्या संघाने सामन्यात 39-30 अशी बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2018 9:22 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 dabang delhi win first inter zonal match beat bengal warriors
टॅग : Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात पुणेरी पलटण ठरली सरस, यू मुम्बावर केली मात
2 Pro Kabaddi Season 6 : यूपी योद्धा विरुद्ध बंगाल टायगर्स सामना बरोबरीत
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर पुणेरी पलटणचा विजयी श्रीगणेशा
Just Now!
X