News Flash

Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्सची दबंग दिल्लीवर मात

हरयाणाची पराभवाची मालिका खंडीत

हरयाणाकडून चढाईत आक्रमक खेळ करणारा विकास कंडोला

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये हरयाणा स्टिलर्स संघाने आपल्या पराभवाची मालिका खंडीत केली आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात हरयाणाने दबंग दिल्लीवर ३४-३१ ने मात केली. हरयाणाकडून विकास कंडोला आणि मोनू गोयतने चढाईत आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. विकासने ९ तर मोनू गोयतने ७ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हरयाणाच्या बचावफळीनेही या सामन्यात चोख कामगिरी बजावली. दबंग दिल्लीच्या संघाने संपूर्ण सामन्यात हरयाणा स्टिलर्स संघाला चांगली टक्कर दिली. मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे हरयाणाने सामन्यात बाजी मारली. दिल्लीकडून चढाईमध्ये चंद्रन रणजित आणि पवन कादियान यांनी अनुक्रमे ८ व ७ गुणांची कमाई केली. आज हरयाणा शहरातले सामने संपले असून उद्या पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कबड्डीचे सामने रंगणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2018 9:47 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 haryana steelers beat dabang delhi
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा हरयाणा स्टीलर्सवर विजय
2 Pro Kabaddi Season 6 : तामिळ थलायवाजचा सलग पाचवा पराभव
3 Pro Kabaddi Season 6 : हरयाणाची झुंज मोडून जयपूरची सामन्यात बाजी
Just Now!
X