08 August 2020

News Flash

संघाच्या पराभवाला मी जबाबदार! यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीची कबुली

गुजरातविरुद्ध सामन्यात यू मुम्बाचा बचाव सपशेल अपयशी

गुजरातच्या खेळाडूची पकड करत असताना कर्णधार फजल व यू मुम्बाचे इतर खेळाडू

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडून पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत गुजरातने मुंबईवर ३८-३६ अशा दोन गुणांच्या फरकाने बाजी मारली. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ जोशाने खेळले, त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचं पारडं दोलायमान होत होतं. मात्र मोक्याच्या क्षणी यू मुम्बाच्या चढाईपटूंनी केलेली चूक संघाला चांगलीच महागात पडली. दुसऱ्या सत्रात ४-५ गुणांनी आघाडीवर असणारा यू मुम्बाचा संघ अचानक ५ गुणांनी पिछाडीवर पडला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर मुंबई गुजरातकडून पराभूत

यू मुम्बाच्या बचावफळीने गुजरातविरुद्धच्या फॉर्मात निराशाजनक खेळ केला. सुरिंदर सिंहने कव्हरच्या जागेवरुन खेळताना अनेक गुणांची खैरात केली. बचावफळीच्या याच क्षुल्लक चुकांमुळे संघाला सामना गमवावा लागला का असा प्रश्न विचारला असता, फजल अत्राचलीने एखाद्या कुशल कर्णधाराप्रमाणे आपल्या संघाचा बचाव केला. “आमचा संघ सामना हरलाय यासाठी मी जबाबदार आहे. अखेरच्या क्षणात मी काही पकडी करायला नको होत्या. मात्र स्पर्धेत एखाद्या सामन्यात अशा गोष्टी होत असतात. काहीवेळेपर्यंत सामन्यावर आमचं नियंत्रण होतं, मात्र गुजरातने ती संधी हिरावून घेतली, याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं.” फजल पत्रकारांशी बोलत होता.

“सुरिंदर हा तरुण खेळाडू आहे, त्यामुळे जोशात त्याच्याकडून काहीवेळा चुका होत असतात. मात्र प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. आज त्याच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरीही पुढच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल याबद्दल मला आत्मविश्वास आहे. प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू त्याला लक्ष्य करतायत, मात्र संपूर्ण सामन्यात १-२ वेळाच त्यांना यश मिळतं.” यू मुम्बाच्या प्रशिक्षकांनीही सुरिंदरला आपला पाठींबा दर्शवला. प्रो-कबड्डीच्या इतिहासात यू मुम्बाचा संघ एकदाही गुजरातला हरवु शकलेला नाहीये. शनिवारी झालेल्या सामन्यानंतर गुजरातने आपला हा विक्रम कायम राखला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2018 8:30 am

Web Title: pro kabaddi 2018 season 6 i am responsible for team defeat says u mumba captain fazal atrachali
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर मुंबई गुजरातकडून पराभूत
2 Pro Kabaddi Season 6 : गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सूर गवसला, बंगालवर मात
3 Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेश विरुद्ध तेलगू टायटन्स सामना बरोबरीत
Just Now!
X