25 September 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पंचकुलात हलवले

सवाई मानसिंग मैदानात बांधकाम सुरु असल्याने घेतला निर्णय

प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या समवेत जयपूरचा संघ

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स संघाने आपल्या घरच्या मैदानातील सामने जयपूर ऐवजी पंचकुलाला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सवाई मानसिंह इनडोअर मैदानात सध्या बांधकाम सुरु असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. १४ ते २० डिसेंबरदरम्यान जयपूर पिंक पँथर्स आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळणार आहे. जयपूरचे संघमालक, स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स यांच्या संयुक्त टीमने पंचकुलाच्या जागेची पाहणी केली आहे. यानंतर पंचकुलातल्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये जयपूरच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, त्यामुळे पंचकुलातलं नवीन मैदान त्यांना लाभदायक ठरतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:35 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 jaipur pink panther shifts home base to panchkula from jaipur
टॅग Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : गुजरात फॉर्च्युनजाएंटकडून तामिळ थलायवाजचा धुव्वा
2 Pro Kabaddi Season 6 : पाटणा पायरेट्सचा अष्टपैलू खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर पुणेरी पलटण पराभूत
Just Now!
X