News Flash

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा विजयाने शेवट, बंगाल वॉरियर्सवर मात

२९-२७ ने जिंकला सामना

बंगाल विरुद्ध पाटणा सामन्यातील एक क्षण

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात गतविजेच्या पाटणा पायरेट्सने घरच्या मैदानावर खेळत असताना अखेरच्या सामन्यात विजयाची चव चाखली. बंगाल वॉरियर्सची झुंज पाटणा पायरेट्सने २९-२७ अशी मोडून काढली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती मैदानावर उतरलेल्या पाटणा पायरेट्सने अखेरपर्यंत लढाऊ वृत्ती दाखवली. पाटण्याकडून चढाईमध्ये दीपक नरवाल, मनजीत आणि तुषार पाटील यांनी आपली चमक दाखवली. बचावपटूंनीही त्यांना उत्तम साथ दिली.

सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून दोन्ही संघ एकमेकांना मोठी आघाडी घेऊ देत नव्हते. पहिल्या सत्रात सर्वबाद झाल्यानंतरही बंगाल वॉरियर्सने चांगलं पुनरागमन केलं. बंगालनेही आज मणिंदर सिंहला विश्रांती दिली होती. त्याच्या अनुपस्थितीत महेश गौड, जँग कून ली यांनी चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र पाटणा पायरेट्सची आघाडी कमी करण्यात बंगालच्या संघाला यश आलं नाही. मात्र ७ पेक्षा कमी गुणांनी पराभव स्विकारल्यामुळे बंगालच्या खात्यात एक गुण जमा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 10:08 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 patna pirates beat bengal warriors in their last home match
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात पाटणा पायरेट्सचा पराभवाचा चौकार, बंगळुरुची सामन्यात बाजी
2 Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणला सूर गवसला, दबंग दिल्लीवर मात
3 Pro Kabaddi Season 6 – तेलगू टायटन्सकडून पाटणा पायरेट्सचा धुव्वा
Just Now!
X