News Flash

Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणचा कर्णधार गिरीश एर्नाकला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान

यू मुम्बाविरुद्ध सामन्यात केला अनोखा विक्रम

प्रतिस्पर्धी चढाईपटूची पकड करताना गिरीश एर्नाक

प्रो-कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पाडणं सुरुच ठेवलं आहे. चढाईपटूंमध्ये सिद्धार्थ देसाई, श्रीकांत जाधव, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा हे खेळाडू आपापल्या संघाकडून सर्वोत्तम खेळ करतायत. दुसरीकडे बचावपटूंमध्ये पुणेरी पलटणच्या गिरीश एर्नाकने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात 200 टॅकल पॉईंट पूर्ण कर्णारा गिरीश एर्नाक सहावा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या हंगामात गिरीश एर्नाकच्या खांद्यावर पुणेरी पलटणच्या नेतृ्त्वाची जबाबदारीही आहे.

प्रो-कबड्डीत 200 टॅकल पॉईंट मिळवणारे बचावपटू –

1) मनजित छिल्लर – 262 गुण (80 सामने)

2) संदीप नरवाल – 225 गुण (89 सामने)

3) सुरेंदर नाडा – 222 गुण (71 सामने)

4) मोहित छिल्लर – 217 गुण (80 सामने)

5) रविंद्र पेहल – 215 गुण (70 सामने)

6) गिरीश एर्नाक – 200 गुण (76 सामने)

20 ऑक्टोबर रोजी पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा संघात सामना पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटन संघाने 33-32 अशा फरकाने विजय मिळवला. याच सामन्यात गिरीश एर्नाकने या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : दिग्गजांना मागे टाकून यू मुम्बाचा मराठमोळा सिद्धार्थ देसाई ठरला सरस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2018 7:19 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 puneri paltan captain girish ernak enters elite players list in defending
टॅग : Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : दिग्गजांना मागे टाकून यू मुम्बाचा मराठमोळा सिद्धार्थ देसाई ठरला सरस
2 Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात पुणेरी पलटण विजयी, बंगळुरु बुल्सवर केली मात
3 Pro Kabaddi Season 6 : दिल्ली ठरली दबंग, बंगाल वॉरियर्स पराभूत
Just Now!
X